RCB ... RCB... जेव्हा आवेश खानची प्रेक्षकांनी चिन्नास्वामी स्टेडियमवर उडवली खिल्ला, Video होतोय व्हायरल

Duleep Trophy 2024: आवेश खानला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू(RCB)च्या चाहत्यांच्याकडून आरसीबीच्या नावाचा जयघोष करत चिडवण्यात आले.
Avesh Khan
Avesh Khanesakal
Updated on

Avesh Khan : एमए चिदंबरम स्टेडियमवर दुलीप ट्रॉफी २०२४ मधील इंडिया ए आणि इंडिया बी संघातील पहिला ४ दिवसीय सामना रविवारी संपला. या सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंडिया बी संघाने ७६ धावांनी बाजी मारली. या सामन्यामध्ये इंडिया ए संघाचा गोलंदाज आवेश खानने एकूण ३ विकेट्स घेतले.

सामन्यादरम्यान आवेश खान सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी आला असता रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू(RCB)च्या चाहत्यांच्याकडून आरसीबीच्या नावाचा जयघोष करत चिडवण्यात आले. कारण याच मैदानावर आयपीएल २०२३ च्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघातील सामन्यात लखनौसाठी विजयी धावा केल्यानंतर आवेश खानने हेल्मेट फेकत सेलिब्रेशन केले होते. आवेश खानच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Avesh Khan
Video: डान्स मस्त अन् शेवटची स्टेप भारीच! युवराज सिंगकडून Shubman Gill ला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

या सामन्याचा बदला घेत पुढील सामन्यात बंगळुरूने १२६ धावांचे लक्ष्य देऊन लखनौला १०८ धावांवर बाद करून त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत केले होते. या सामन्यादरम्यान कोहली आणि नवीन-उल-हक व तत्कालीन लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यात मैदानावर बाचाबाची देखील झाली.

आरसीबी चाहत्यांना हा क्षण लक्षात येताच आणि आवेश खान सीमारेषेवर येताना पाहून चाहत्यांच्याकडून आवेश खानला आरसीबी,आरसीबी... असे चिडवण्यात आले. यावेळी त्यानेही चाहत्यांची मजा घेतली. त्यानेही हात उंचावत त्यांना प्रोत्साहन देण्यासारखी कृती केली.

इंडिया ए विरुद्ध इंडिया बी

दुलीप ट्रॉफी २०२४ मधील इंडिया ए आणि इंडिया बी संघातील पहिल्या सामन्यात इंडिया बी संघाने प्रथम फलंदाजी केली. मुशीर खानच्या १८१ धावांच्या दमदार खेळीने आणि नवदीप सैनीच्या ५९ धावांच्या अर्धशतकीय खेळीने पहिल्या डावात इंडिया बी संघाने ३२१ धावसंख्या उभारली.

परंतु इंडिया ए संघाचा पहिला डाव २३१ धावांवर आटपला. दुसऱ्या डावात रिषभ पंतने अर्धशतकीय खेळीच्या जोरावर इंडिया बी संघाने १८४ धावा उभारल्या. परंतु दुसऱ्या डावात इंडिया ए कडून केएल राहुलच्या अर्धशतकीय खेळीशिवाय कोणालाही चांगली कामगीरी करता आली नाही. त्यामुळे इंडिया ए संघाचा डाव १९८ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंडिया बी संघाने ७६ धावांनी सामन्यात बाजी मारली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.