Mumbai vs Maharashtra : रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीचा सामना महाराष्ट्र व मुंबई संघांदरम्यान सुरू आहे. मुंबईने महाराष्ट्राचा डाव अवघ्या १२६ धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरात मुंबईच्या १७ वर्षीय फलंदाज आयुष म्हात्रेने धमाकेदार शतक झळकावले आहे. आयुषने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. तर या सामन्यात आयुषच्या शतकाच्या मदतीने सामन्यात आघडी घेतली आहे. मुंबईने पहिल्या दिवसाअंती ३ विकेट्स गमावून २२० धावा उभारल्या आहेत व सामन्यात ९४ धावांनी आघाडी घेतली आहे.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंजासाठी उतरलेला महाराष्ट्र संघ मुंबईच्या गोलंदाजांसमोर फार काळ टीकू शकला नाही. महाराष्ट्राच्या आझीम काझी व निखील नाईकने ५८ धावांची भागिदारी करत महाराष्ट्रचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु रॉयस्टन डायसने निखीलला (३८) धावांवर माघारी पाठवले आणि महाराष्ट्राचा डाव घरंगळला. महाराष्ट्र संघ पहिल्या डावात केवळ १२६ धावा उभारल्या.
मुंबईने दुपारच्या सत्रात महाराष्ट्राचा डाव गुंडाळला आणि फलंदाजीला सुरूवात केली. सलामीवीर पृथ्वी शॉ एका धावेवर परतला. पण साथीदार आयुष म्हात्रेने मुंबईची बाजू सावरली आणि दणदणीत शतक ठोकले. आयुषने १७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १२७ धावांवर नाबाद आहे. त्याला कर्णधार अजिंक्य रहाणेने (४५) साथ दिली. तर आता आयुषच्या साथील श्रेयस अय्यर ३१ धावांवर खेळत आहे. मुंबईने पहिल्या दिवसाअंती ३ विकेट्स गमावत २२० धावा धावफळकावर लावल्या आहेत. आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या प्रदीप दढे ने २ विकेट्स घेतले. तर हितेळ वळूंजला १ विकेट घेण्यात यश आले.