Ayush Shukla: ४ ओव्हर, शून्य धावा अन् १ विकेट! मुंबईत जन्मलेल्या खेळाडूची हाँग काँगसाठी कमाल, 'हा' ऐतिहासिक विक्रमही नावावर

Ayush Shukla 4 Maiden Overs: हाँग काँगसाठी खेळणाऱ्या आयुष शुक्ला याने टी२० वर्ल्ड कप आशिया क्वालिफायरमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात अफलातून गोलंदाजी करताना ४ षटकांमध्ये एकही धाव दिली नाही.
Hong Kong Cricket team
Hong Kong Cricket teamSakal
Updated on

Mongolia vs Hong Kong T20I Match: टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी चालू असलेल्या आशिया क्वालिफायर्स स्पर्धेत शनिवारी मंगोलियाचा सामना हाँग काँगशी झाला. या सामन्यात हाँग काँगने अतिशय सोपा विजय मिळवला. हाँग काँगने ९ विकेट्सने मिळवलेल्या या विजयात आयुष शुक्ला या भारतीय वंशाच्या गोलंदाजाचा मोठा वाटा होता.

मुंबईतील पालघर जिल्ह्यात जन्मलेला आयुष गेल्या काही वर्षापासून हाँगकाँगसाठी खेळतोय. तो हाँग काँगसाठी १९ वर्षांखालील क्रिकेटही खेळला, त्यानंतर आता त्याला २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पदार्पणाची संधी मिळाली.

त्याने २०२२ आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्ध खेळताना कर्णधार रोहित शर्माला बाद केलं होतं. आता २१ वर्षीय आयुषने शनिवारी अफलातून कामगिरी केली.

Hong Kong Cricket team
DJ Brovo ने अचानक घेतला निवृत्तीचा निर्णय, नाईट रायडर्ससाठी 'या' स्पर्धेत अखेरचे खेळणार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com