Pakistan Cricket : भिकेला लागलेल्या पाकिस्तानमध्ये खायचे वांदे अन् क्रिकेटर आझम खान पुसतोय नोटांनी घाम; Video व्हायरल

Azam Khan Controversial Video : आझम खानच्या या व्हिडिओत बाबर आझम अन् अन्य खेळाडू देखील दिसले
Azam Khan
Azam Khan Video Viral esakal
Updated on

Azam Khan Video Viral : पाकिस्तानचा युवा विकेटकिपर फलंदाज आझम खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आझम खान हा अमेरिकी डॉलर्सने घाम पुसताना दिसत आहे. या व्हिडिओत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि काही इतर खेळाडू देखील दिसत आहेत.

दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेट चाहते देशातील हालाकीची आर्थिक परिस्थिती पाहता क्रिकेटपटूंनी थोडी तरी संवेदनशीलता दाखवली पाहिजे असं म्हणत आझम खानवर टीका करत आहेत.

Azam Khan
Virat Kohli RR vs RCB : विराट कोहलीने रचला इतिहास; 8 हजारी मनसबदारी मिळवणारा ठरला पहिला खेळाडू

आझम खानच्या या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने शिक्षणाच्या गरजेवर भर देत म्हटले की, 'म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो की मूलभूत शिक्षण आवश्यक आहे, हे लोक जगभर फिरतात पण मूलभूत मानवी मूल्ये शिकत नाहीत. त्यांना आंतरराष्ट्रीय मंचावर पाठवण्यापूर्वी शाळेत पाठवा.' एका चाहत्याने लिहिले की, जेव्हा पाकिस्तानी लोक अन्नाच्या कमतरतेशी झगडत होते, तेव्हा आझम गरीब लोकांची चेष्टा करत होते.

Azam Khan
Sandeep Lamichhane : बलात्काराच्या आरोपातून मुक्तता मात्र व्हिसा नाकारला! संदीपसाठी टी20 वर्ल्डकपचं दार बंदच

पाकिस्तानी संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये चार टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला सामना आज लीड्समध्ये खेळवला जाणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी फुल ड्रेस रिहर्सल म्हणून याकडे पाहिले जात आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये दोन्ही संघांची शेवटची टक्कर झाली होती. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ब्रिटिशांनी पाकिस्तानचा वाईट पद्धतीने पराभव केला होता.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.