Babar Azam: T20 क्रिकेटमध्ये बाबर आझमचा मोठा कारनामा, आता विराट-रोहितशी वर्ल्ड कपमध्ये रंगणार शर्यत

Babar Azam: बाबर आझमने टी20 क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आता तो टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावांसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीशी शर्यत करेल.
Babar Azam | Virat Kohli - Rohit Sharma
Babar Azam | Virat Kohli - Rohit SharmaSakal

Babar Azam T20I Record: पाकिस्तानचा संघाने नुकतीच इंग्लंडविरुद्ध टी20 मालिका खेळली. या मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना गुरुवारी (30 मे) लंडन येथे पार पडला. या सामन्यात इंग्लंडने 7 विकेट्सने विजय मिळवत मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली.

मात्र असे असले तरी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने या सामन्यादरम्यान मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

इंग्लंड विरुद्ध चौथ्या टी20 सामन्यात बाबरने 22 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 36 धावांची खेळी केली. यासह त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा पार केला आहे.

तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारा जगातील दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी हा कारनामा केवळ भारताच्या विराट कोहलीने केला आहे. विराट आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाराही क्रिकेटपटू आहे.

Babar Azam | Virat Kohli - Rohit Sharma
Loksabha Election 2024: बंगालमध्ये सत्तापालट होणार? 'या' दिग्गज क्रिकेटरने निवडणूकीच्या निकालाबाबत स्पष्ट सांगितले

टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट-रोहितशी शर्यत

दरम्यान, आता आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याबाबत बाबर आझमची शर्यत जूनमध्ये होत असलेल्या टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माशी असणार आहे. कारण सध्या या विक्रमाच्या यादीत हे तिघेही पहिल्या तीन क्रमांकांवर असून त्यांच्या जास्त धावांचे अंतर नाही.

सध्या या यादीत विराट 117 सामन्यांत 4037 धावांसह अव्वल क्रमांकावर आहे. तसेच बाबर 119 सामन्यांमध्ये 4023 धावांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर रोहित 151 सामन्यांत 3974 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू

  • 4037 धावा - विराट कोहली (117 सामने)

  • 4023 धावा - बाबर आझम (119 सामने)

  • 3974 धावा - रोहित शर्मा (151 सामने)

  • 3589 धावा - पॉल स्टर्लिंग (142 सामने)

  • 3531 धावा - मार्टिन गप्टील (122 सामने)

Babar Azam | Virat Kohli - Rohit Sharma
WI vs AUS, Warm-Up Match: वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियाला पराभवाचा दणका; पूरनची 300 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी

पाकिस्तानचा पराभव

दरम्यान, चौथ्या टी20 सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकात सर्वबाद 157 धावा केल्या होत्या. त्यानंतर 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इंग्लंडने 15.3 षटकात 3 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला.

दरम्यान, या टी20 मालिकेतील पहिला आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा सामना इंग्लंडने 23 धावांनी जिंकला होता. त्यामुळे इंग्लंडने ही मालिका 2-0 अशी जिंकली.

या मालिकेनंतर आता इंग्लंड आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ टी20 वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे दाखल होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com