Babar Azam : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड दरम्यान अंतिम झाला. हा सामना इंग्लंडने ५ विकेट्सने जिंकला होता. या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने वापरलेली बॅट मेलबर्न क्रिकेट क्लबच्या लाँग रूममध्ये प्रदर्शनासाठी दान केली. या सामन्यात बाबर आझमने ३२ धावांची खेळी केली होती.
एमसीजीला बॅट दान करताना बाबर म्हणाला, “माझी बॅट प्रदर्शनासाठी एमसीजीमध्ये ठेवणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे, कारण मी या बॅटचा वापर करून वर्ल्ड कप फायनल खेळलो आहे.'
'माझ्याकडे MCG मधील खूप चांगल्या आठवणी आहेत. इथे मी खुप क्रिकेट खेळलो आहे आणि मला इथे खेळायला आवडते. हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम मैदानांपैकी एक आहे. कारण या खेळपट्टीवर चेंडू सहज खेळता येतो. मी फक्त माझ्यावर विश्वास ठेवतो आणि माझ्या योजना अंमलात आणतो कारण इथे जर तुम्ही सेट असाल, तर खुप धावा करता येतात.'
'डॉन ब्रॅडमन, डेव्हिड बून, जॅक हॉब्स आणि इतर अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी भूतकाळात त्यांच्या बॅट प्रदर्शनासाठी दान केल्या आहेत. त्यांच्यामध्ये माजी बॅट प्रदर्शनासाठी लागणे हा माझ्यासाठी सन्मान आहे." बाबर आझम पुढे म्हणाला.
बाबर आझमने नुकताच पाकिस्तान पुरूष क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बाबरला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर संघातून वगळण्यात आले. बाबर आझम सध्या त्याच्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे.