PAK vs ENG: पाकिस्तानने कसोटी जिंकली; Babar Azam, शाहीन आफ्रिदी, शाहिद यांच्याकडून कौतुक

PAK vs ENG 2nd Test: इंग्लंडविरूद्धचा दुसरा कसोटी सामना पाकिस्तानने १५४ धावांनी जिंकला व मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे.
PAK vs ENG
PAK vs ENGesakal
Updated on

PAK vs ENG 2nd Test: पाकिस्तानने इंग्लंडविरूद्धचा पहिला सामना गमवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पुनरागमन केले आणि सामना आपल्या नावे केला. पाकिस्तनने सामना १५४ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-१ने बरोबरी केली. पहिल्या सामन्यातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानने संघात बदल केला होता. ज्यामध्ये बाबार आझम, शाहीन आफ्रिदी नसीम शाहला संघातून बाहेर करण्यात आले होते. त्याजागी संघात नव्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आणि या खेळाडूंनी सामन्यात चांगली कामगिरी केली. त्यामुळे संघातून बाहेर केलेल्या वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि बाबर आझमने पाकिस्तान संघाचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने देखील सोशल मीडियावर अभिनंदन पोस्ट शेअर करत संघाचे व खेळाडूंचे अभिनंदन केले.

संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला,"घरच्या मैदानावर शानदार विजय! पाकिस्तानचे अभिनंदन, नोमान अली आणि साजिद खान यांनी चांगली कामगिरी केली, तसेच कामरान घुलामचे स्वप्नवत पदार्पण आणि सलमान अली आगाचे विजयात मोठे योगदान. अशीच कामगिरी करत रहा!"

माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने याआधी निवड समितीने बाबर, शाहीन, नसीमला संघातून बाजूला करण्यच्या निर्णयाचे स्वागत केले होते. त्यानंतर पाकिस्तानने दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर संघाचे अभिनंदन केले आहे. "मोठा धोका म्हणजे मोठे बक्षिसे! ज्यावेळी तुम्ही तुमच्या वेगवान गोलंदाजांना सपोर्ट करण्यासाठी खेळपट्टी तयार करू शकत नाही, तेव्हा तुमच्या फिरकीपटूंवर विश्वास ठेवणे ही सर्वोत्तम रणनीती होती, आणि त्याचे फळ मिळाले. पाकिस्तान क्रिकेट संघाचे अभिनंदन, विशेषत: कामरान घुलाम, सलमान अली, नोमान अली आणि साजिद खान. तुमच्याकडून आणखी अनेक विजयांची आणि यशाची अपेक्षा आहे!" शाहीद म्हणाला.

तर मागच्या काही महिन्यांपासून आपल्या खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या बाबर आझमला नव्या निवड समितीकडून संघाच्या बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. परंतु बाबरने देखील आपल्या विजयी संघाचे ट्वीट करून अभिनंदन केले आहे. "संघाने सुंदर कामगिरी केली! विलक्षण विजय, आम्हाला तुमचा अभिमान आहे." बाबर म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.