India-Pakistan: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणार सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या? वाचा नेमकं प्रकरण

If Afro-Asia Cup Returns then Asia XI: आफ्रो-आशिया चषक स्पर्धा पुन्हा आयोजित करण्याबद्दल विचार केला जात असून भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडू आशिया इलेव्हन संघामधून पुन्हा एकदा एकत्र खेळण्याची शक्यता आहे.
Suryakumar Yadav, Hardik Pandya, Babar Azam
Suryakumar Yadav, Hardik Pandya, Babar Azamesakal
Updated on

India and Pakistan Afro-Asia Cup: भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू भविष्यात पुन्हा एकदा एकत्र खेळण्याची शक्यता आहे. कारण आफ्रो-आशिया चषक स्पर्धा पुन्हा आयोजित करण्याबाबत विचार केला जात आहे. ही स्पर्धा २००७ मध्ये शेवटची खेळवण्यात आली होती. आफ्रिका-आशिया संघांदरम्यान स्पर्धेमध्ये एक ट्वेंटी-२० सामना आणि तीन वन-डे सामने झाले होते. त्यामध्ये ४-० ने आशिया संघाने स्पर्धेमध्ये बाजी मारली होती. आता १७ वर्षांनंतर पुन्हा या स्पर्धेची चर्चा सुरू झाली आहे.

२००७ मध्ये कसा होता संघ?

वन डे संघ : महेला जयवर्धने (कर्णधार, श्रीलंका), महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक, भारत), दिलहारा फर्नांडो (श्रीलंका), सौरव गांगुली (भारत), हरभजन सिंग (भारत), सनथ जयसूर्या (श्रीलंका), झहीर खान (भारत), मश्रफे मोर्तझा (बांगलादेश), मोहम्मद आसिफ (पाकिस्तान), मोहम्मद रफीक (बांगलादेश), मोहम्मद युसूफ (पाकिस्तान), वीरेंद्र सेहवाग (भारत), उपुल थरंगा (श्रीलंका), युवराज सिंग (भारत), लसिथ मलिंगा (श्रीलंका), शोएब अख्तर (पाकिस्तान), सचिन तेंडुलकर (भारत), चमिंडा वास (श्रीलंका)

Suryakumar Yadav, Hardik Pandya, Babar Azam
IND vs BAN Test : टीम इंडियाला टक्कर देण्यासाठी बांगलादेशने जाहीर केला संघ; पाकिस्तानला लोळवले अन् आता...

ट्वेंटी-२० संघ: शोएब मलिक (कर्णधार, पाकिस्तान), कमरान अकमल (यष्टीरक्षक, पाकिस्तान), अब्दुर रझाक (बांगलादेश),तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका), इम्रान नझीर (पाकिस्तान), परवेझ महरूफ (श्रीलंका), मश्रफे मोर्तझा (बांगलादेश),मोहम्मद अश्रफुल (बांगलादेश), शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान), सचिन तेंडुलकर (भारत), तमिम इक्बाल (बांगलादेश), मुनाफ पटेल (भारत)

जय शाह डिसेंबरमध्ये आयसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत, त्यातच आफ्रो-आशिया कपच्या पूर्नआयोजनाबाबत चर्चा सुरू आहे. जर आफ्रो-आशिया चषक स्पर्धा पुन्हा आयोजित करण्यात आली, तर आशियातील खेळाडूंच्या ट्वेंटी-२० कामगिरी आणि विक्रमांनुसार आशिया इलेव्हन ट्वेंटी-२० संघ खालीलप्रमाणे असू शकतो.

Suryakumar Yadav, Hardik Pandya, Babar Azam
IPL 2025 Auction साठी सारे सज्ज! Mumbai Indians ३ अष्टपैलू खेळाडूंवर लावू शकतात तगडी बोली

संभाव्य आशिया इलेव्हन ट्वेंटी-२० संघ:

लिटन दास (यष्टीरक्षक, बांगलादेश), यशस्वी जैस्वाल (भारत), बाबर आझम (कर्णधार, पाकिस्तान), सूर्यकुमार यादव (भारत), चरिथ असलंका (श्रीलंका), हार्दिक पंड्या (भारत), वानिंदू हसरंगा (श्रीलंका), राशीद खान (अफगाणिस्तान) शाहीन शाह आफ्रिदी (पाकिस्तान), जसप्रीत बुमराह (भारत), मथीशा पाथिराना (श्रीलंका)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()