BAN vs SA Test: टोनी दी झोर्झीचं विक्रमी शतकानंतर 'आईस-कोल्ड' सेलीब्रेशन, तर स्टब्सचाही बांगलादेशला मायदेशात दणका

Tony de Zorzi and Tristan Stubbs Century: बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या टोनी दी झोर्झी आणि ट्रिस्टन स्टब्सने यांनी शतके करत पहिला दिवस गाजवला. यासह त्यांनी काही विक्रमही केले आहेत.
Tony de Zorzi-Tristan Stubbs Century
Tony de Zorzi-Tristan StubbsSakal
Updated on

Bangladesh vs South Africa Test: दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना चितगावला मंगळवारी (२९ ऑक्टोबर) सुरू झाला आहे. या सामन्याचा पहिलाच दिवस सलामीवीर टोनी दी झोर्झी आणि ट्रिस्टन स्टब्सने गाजवला. या दोघांनीही पहिल्याच दिवशी शतकं साजरी केली आहेत.

दरम्यान, झोर्झीने शतक झळकावल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनने सर्वांचे लक्ष वेधले. तसेच त्याने काही विक्रमही नावावर केले.

दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार एडेन मार्करम आणि झोर्झी यांनी पहिल्या डावाची सुरुवात केली. त्यांनी ६९ धावांची भागीदारीही केली. पण ३३ धावांवर मार्करम बाद झाला. त्यानंतर झोर्झीला स्टब्सने तोलामोलाची साथ दिली.

यादरम्यान १४६ चेंडूत झोर्झीने शतक साजरे केले. हे त्याचे पहिले कसोटी शतक ठरले. त्याने हे शतक करतात अनोखे 'आईस-कोल्ड' सेलिब्रेशनही केले. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

Tony de Zorzi-Tristan Stubbs Century
BAN vs SA 1st Test : Kagiso Rabada चा वर्ल्ड रेकॉर्ड! टीम इंडियाचा 49 All Out चा नकोसा विक्रम बांगलादेशने थोडक्यात टाळला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.