Live मॅचमध्ये घडली मोठी घटना! एकाच सामन्यात 4 खेळाडू जखमी, एकजण थेट पोहचला हॉस्पिटलमध्ये...

Bangladesh vs Sri Lanka 3rd ODI : एकाच सामन्यात चार खेळाडू जखमी... यातील दोन खेळाडूंना स्ट्रेचरवरून काढले मैदानाबाहेर.... तर एकजण थेट पोहचला हॉस्पिटल
BAN vs SL odi four players injured Marathi News
BAN vs SL odi four players injured Marathi Newssakal
Updated on

Bangladesh vs Sri Lanka 3rd ODI : श्रीलंकेचा संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे या सामन्यात चार खेळाडू जखमी झाले आहे. यातील दोन खेळाडूंना स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर काढावे लागले. तर एकाची दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यालाही थेट रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

BAN vs SL odi four players injured Marathi News
Hardik Pandya Vs Rohit Sharma IPL 2024 : रोहित अन् पांड्यामध्ये संभाषणच नाही... कर्णधारपद मिळाल्यापासून पांड्या, रोहित बोललेच नाहीत?

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला दुखापत झाली. मुस्तफिजुर रहमानला क्रॅम्पमुळे मैदान सोडावे लागले. श्रीलंकेच्या डावात 42व्या षटकातील शेवटचा चेंडू टाकताना तो मैदानावर पडला. यावेळी तो काहीशा अडचणीत दिसत होता. असे असूनही त्याने 48व्या डावात पुन्हा गोलंदाजी केली आणि पहिल्याच चेंडूवर तो पुन्हा मैदानावर पडला. त्यानंतर वैद्यकीय पथक मैदानावर आले आणि त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर काढले.

BAN vs SL odi four players injured Marathi News
IPL 2024 : धोनी टेन्शनमध्ये! कॉनवे-पाथिराना नंतर CSK चा आणखी एक खेळाडू जखमी

यासोबत बांगलादेशचा यष्टिरक्षक जाकर अली याला गंभीर दुखापत झाली आहे. क्षेत्ररक्षण करताना त्याला ही दुखापत झाली. झेल घेण्याच्या प्रयत्नात तो त्याचा सहकारी खेळाडू अनामुल हकशीला जाऊन धडकला, त्यामुळे तो जखमी झाला. यानंतर जाकर अलीलाही स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर काढण्यात आले. मात्र त्याची दुखापत पाहून त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

BAN vs SL odi four players injured Marathi News
CSK vs RCB Match Tickets Booking : उद्घाटनाच्या सामन्याची तिकीट विक्री झाली सुरू, जाणून घ्या कसं करायचं ऑनलाईन बुकिंग

या सामन्यात मुस्तफिजुर रहमान आणि जाकेर अली यांच्याशिवाय आणखी दोन खेळाडू जखमी झाले. हे दोन्ही खेळाडू बांगलादेशचे आहेत. खरंतर, जाकर अलीशी टक्कर दिल्यानंतर अनामूल हकही जखमी झाला होता. त्याची दुखापत गंभीर नव्हती. याशिवाय सौम्या सरकारलाही क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. सौम्या सरकारही दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर आहे.

या सामन्याबद्दल बोलयचे झाले तर, श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 235 धावा केल्या. बांगलादेशकडून तस्किन अहमदने 3 बळी घेतले, तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. बांगलादेशने तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जिंकला. तर श्रीलंकेने दुसरी वनडे जिंकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.