IND vs BAN T20I : सूर्याच्या टीमला टक्कर देण्यासाठी बांगलादेशने जाहीर केला संघ; स्टार खेळाडूला दीड वर्षानंतर बोलावले

Bangladesh squad T20I : कसोटी मालिकेनंतर भारत-बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताची युवा ब्रिगेट खेळणार आहे.
Bangladesh squad T20I
Bangladesh squad T20I esakal
Updated on

Bangladesh Squad vs India T20I series : दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारत-बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका होणार आहे. या मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली बांगलादेशला टीम इंडिया भिडणार आहे. पण, बांगलादेशनेही या मालिकेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. त्यांनी दीड वर्षानंतर अष्टपैलू खेळाडूला ट्वेंटी-२०त पुनरागमनाची संधी दिली आहे.

शाकिब अल हसनने ट्वेंटी-२०तून निवृत्ती जाहीर केल्यामुळे त्याच्या जागी मेहिदी हसन मिराझ ट्वेंटी-२० संघात परतला आहे. तो मागच्या वर्षी जुलै महिन्यात शेवटची ट्वेंटी-२० मॅच खेळला होता. त्यानंतर त्याला २४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांना मुकावे लागले होते. पण, या कालावधीत त्याने वन डे व कसोटी संघात आपले नाणे खणखणीत वाजवले. मिराजसह ट्वेंटी-२० संघात परवेज होसैन इमोन व रकिबूल हसन यांचाही समावेश केला गेला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या सौम्या सरकारला भारताविरुद्धच्या मालिकेत स्थान मिळालेले नाही. मिराजने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २० इनिंग्जमध्ये २४८ धावा केल्या आहेत.

Bangladesh squad T20I
IND vs BAN 2nd Test: नाद खुळा...! Rohit Sharma ने एका हाताने टिपलेला अफलातून कॅच पाहिलात का? सारेच थक्क Video

बांगलादेश ट्वेंटी-२० संघ : नजमूल होसैन शांतो ( कर्णधार), तंझिज हसन तमिम, परवेझ होसैन इमोन, तौहिद हृदय, महमुदुल्लाह, लिटन दास, जाकेर अली अनिक, मेहिदी हसन मिराज, महेदी हसन, रिशाद होसैन, मुस्ताफिजूर रहमान, तस्किन अहमद, शोरिफूल इस्लाम, तंझिम हसन साकिब, रकिबुल हसन

भारताचा ट्वेंटी-२० संघ : सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव

वेळापत्रक...

  • ६ ऑक्टोबर - पहिला टी२० सामना, ग्वाल्हेर (संध्या. ७ वा.)

  • ९ ऑक्टोबर - दुसरा टी२० सामना, दिल्ली (संध्या. ७ वा.)

  • १२ ऑक्टोबर - तिसरा टी२० सामना, हैदराबाद (संध्या. ७ वा.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.