VIDEO : अल्ट्रा-एज गंडले की अंपायर... बॅटला बॉल लागला तरीही थर्ड अंपायरने दिला नॉट आऊट; खेळाडू संतापले
Bangladesh vs Sri Lanka Match Controversy : बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मोठा वाद झाला. श्रीलंकेच्या संघाचे खेळाडू आणि सहाय्यक प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर चांगलेच संतापलेले दिसले.
दोन्ही संघांमधील हा सामना सिल्हेटच्या मैदानावर खेळला गेला ज्यात बांगलादेश संघाने 8 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 165 धावा केल्या, तर बांगलादेशने हे लक्ष्य केवळ 18.1 षटकांत पार केले. बांगलादेशच्या डावादरम्यान, सौम्स सरकारच्या विकेटवरून वाद झाला, ज्यामध्ये जेव्हा तिसऱ्या पंचाने मैदानावरील पंचाचा निर्णय रद्द केला तेव्हा श्रीलंकेचे खेळाडू नाराजी व्यक्त करताना दिसले.
फील्ड अंपायरने दिले आऊट पण थर्ड अंपायर म्हणाला नॉट आऊट...!
सिल्हेटच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशचा संघ 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. तेव्हा डावाच्या चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सौम्या सरकारविरुद्ध कॅच आऊटचे अपील करण्यात आली. मैदानावरील पंचाने त्याला आऊट घोषित केले.
पण वेळ न घालवता सौम्या सरकारने रिव्ह्यू घेतला. यानंतर जेव्हा तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिला तेव्हा त्यांच्या मते चेंडू आणि बॅटमध्ये अंतर होते, जेव्हा चेंडू बॅटजवळून गेला तेव्हा स्टंपच्या माईकवर आवाज आला, जो अल्ट्रा एजमध्येही दिसत होता. असे असूनही, तिसऱ्या पंचांनी सौम्या सरकारला नॉट आऊट दिले आणि यामुळे श्रीलंकेचे खेळाडू चांगलेच संतापलेले दिसले आणि त्यांनी मैदानावरील पंचांशी बराच वेळ चर्चा केली.
दरम्यान, ड्रेसिंग रुममध्ये उपस्थित श्रीलंका संघाचे सहाय्यक प्रशिक्षकही चौथ्या पंचाकडे जाऊन निर्णयावर चर्चा करताना दिसले. सौम्या सरकारविरुद्ध जेव्हा हे अपील करण्यात आले तेव्हा तो 10 चेंडूत 14 धावा करून खेळत होता, मात्र नंतर तो 26 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
जर आपण या सामन्याबद्दल बोललो तर, बांगलादेश संघाकडून शानदार फलंदाजी पाहायला मिळाली. बांगलादेश संघाचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने 38 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 53 धावांची नाबाद खेळी खेळून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, त्याला तौहीदचीही साथ लाभली. आता उभय संघांमधील या मालिकेतील निर्णायक सामना 9 मार्चला होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.