Bangladesh Cricket : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी बांगलादेश क्रिकेटपटूंना महत्त्वाची सूचना

Bangladesh's sports adviser advise बांगलादेश क्रिकेटपटूंनी राजकारणात येऊ नये असा सल्ला क्रीडा सल्लागार आसिफ महमूद यांनी दिला आहे.
shakib al hasan
shakib al hasanesakal
Updated on

Asif Mahmud Sajib Bhuiyan: बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनवरचा खूनाचा आरोप आणि त्याला बांगलादेश क्रिकेट बोर्डा(BCB)कडून मिळालेल्या राजकीय सहकार्याची सध्या जोरदार चर्चा आहे. अशात बांगलादेशचे युवा आणि क्रीडा सल्लागार आसिफ महमूद साजिब भुईयान यांनी सक्रिय क्रिकेटपटूंनी राजकारणात येऊ नका असा सल्ला दिला आहे.

त्यांचा हा सल्ला माजी कर्णधार मश्रफी मोर्तझा आणि अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन यांच्यासाठी होता. दोघेही त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या कालावधीत सक्रिय राजकारणात सहभागी आहेत. असिफ यांनी क्रिकेटपटूंच्या सट्टेबाजी वेबसाइट्सच्या जाहिरातींवरही आक्षेप घेतला आहे.

shakib al hasan
Duleep Trophy 2024: टीम इंडियात एन्ट्री घेऊ पाहणारा स्टार फलंदाज फेल, निम्मा संघ ३४ धावांत तंबूत; रोहितची चिंता वाढली

"मला वाटते की त्यांनी खेळ आणि राजकारण एकत्र करू नये. कदाचित कोणी निवृत्तीनंतर राजकारणात सहभागी होऊ शकेल, परंतु तरीही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करत असताना राजकारणात सहभागी होऊ नये, असे मला वाटते आणि मी याबद्दल आधीच बोललो आहे," असिफ यांनी क्रिकबझला सांगितले.

पुढे असिफ म्हणाले, " सट्टेबाजीच्या वेबसाइट्सची जाहिरात क्रिकेटपटूंनी करू नये. त्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे असायला हवीत. काही भारतीय क्रिकेटपटूंवर सट्टेबाजीच्या व्यवसायात असल्याबाबत आरोप आहेत आणि बांगलादेशी क्रिकेटपटूंची देखील नावं आहेत. यासाठी मार्गदर्शक तत्त्वे असायला हवीत आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड(BCB)ते करू शकेल.''

shakib al hasan
India vs Bangladesh: बांगलादेशविरूद्ध मालिकेसाठी कधी होणार भारतीय संघाची घोषणा? समोर आली तारीख

असिफ यांनी पुढे अशी शिफारस केली की एखादा अध्यक्ष दोन टर्मपेक्षा जास्त काळ क्रिकेट बोर्डावर असू शकत नाही. एखादी व्यक्ती दीर्घकाळ सत्तेवर असते तेव्हा लोकशाही मार्गात अडथळा येतो. असिफ यांनी सट्टेबाजी वेबसाइट्सच्या जाहिराती करणारे क्रिकेटपटू व BCB मधील अंतर्गत राजकारणावर निशाणा साधला आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डला स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन एका खुनाच्या प्रकरणात आरोपी असल्याने त्याच्यावर बंदी घालण्यासाठी कायदेशीर नोटीस मिळाली होती, परंतु BCBने नोटीसला उत्तर देत शाकिबला खेळत राहण्याचे आदेश देले आहेत. पाकिस्तानविरूद्धच्या दणदणीत विजयानंतर बांग्लादेश संघ १९ सप्टेंबर पासून २ कसोटी आणि ३ ट्वेंटी-२० सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.