Shakib Al Hasan IND vs BAN: शाकिब अल हसनवर हत्येचा गुन्हा; भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी BCB चा मोठा निर्णय

Shakib Al Hasan is accused in murder case: अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याच्यावर हत्येचा आरोप केला गेला आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान ही घटना आहे.
sakib al hasa
sakib al hasaesakal
Updated on

Shakib Al Hasan's Murder Accusation: बांगलादेशच्या संघाने रावळपिंडी येथे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. पाकिस्तानविरुद्ध त्यांनी १० गडी राखून ऐतिहासिक विजय साजरा केला आहे. बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यातील हा पहिलाच विजय आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डला स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला माघारी बोलावण्यासाठी आणि त्याच्यावर बंदी घालण्यासाठी कायदेशीर नोटीस मिळाली होती. बांगलादेशातील हिंसाचारात ७ ऑगस्ट रोजी रफीकुल इस्लामचा मुलगा रुबेल मारला गेला आणि त्याने दाखल केलेल्या तक्रारीत शाकिबचेही नाव आहे. त्यामुळे हत्येचा गुन्हा असलेल्या शाकिबला माघारी बोलवण्याची नोटीस होती.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) अध्यक्ष फारुक अहमद यांनी सांगितले की, पहिली कसोटी संपल्यानंतर बोर्ड शाकिबबाबत निर्णय घेईल. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार बीसीबीने शकीबला मालिकेत पुढे खेळत राहण्याची परवानगी दिली आहे. "सध्या एफआयआर दाखल झाला आहे आणि हा सुरुवातीचा टप्पा आहे, यानंतर बरेच टप्पे बाकी आहे. जोपर्यंत तो दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला खेळण्याची परवानगी देऊ. पाकिस्तान मालिकेनंतर आमचा संघ भारतात जाणार आहे आणि आम्हाला शाकिब तिथे हवा आहे. आवश्यक असल्यास आम्ही त्याला कायदेशीर मदत देऊ."

sakib al hasa
PAK vs BAN 2nd Test: पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का; बांगलादेशविरुद्ध मालिका वाचवण्याचे आव्हान

१९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतही शाकिब खेळताना पाहायला मिळेल. "शाकिबने खेळायला हवे. त्याला परत बोलावण्यासाठी कायदेशीर नोटीस मिळाली आणि आम्ही त्यांना उत्तर दिले आहे," असे बीसीबीचे अध्यक्ष फारुक अहमद यांनी बंगाली दैनिक प्रथमला सांगितले.

पाकिस्तान दौरा संपवून शाकिब मायदेशी परतणार नाही, कारण तो कौंटी क्रिकेटसाठी इंग्लंडला जाणार आहे. त्यासाठी त्याला बांगलादेश बोर्डाकडून एनओसी (NOC) ही मिळाली आहे. "शाकिब काही काळापासून कसोटी क्रिकेट खेळला नाही आणि म्हणूनच आम्ही त्याला इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी एनओसी दिली आहे," अशी BCB ने पुष्टी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.