AFG vs NZ Test : BCCI चं नाव खराब झालंच! भारतात ९१ वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये असं कधीच नव्हतं घडलं...

Afghanistan Vs New Zealand : अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातला कसोटी सामना ग्रेटर नोएडा येथे खेळवण्यात येणार होता, परंतु तिथे जे घडलं ते BCCI चं नाक कापणारं ठरलं.
Afghanistan Vs New Zealand
Afghanistan Vs New Zealand esakal
Updated on

Afghanistan Vs New Zealand Test Greater Noida:

भारतात आतापर्यंत २९१ कसोटी सामने खेळले गेले... आशियातील कसोटी सामन्यांचा आकडा हा ७३० इतका आहे... पण, मागील ९१ वर्षांत जे घडलं नव्हतं ते Greater Noida येथे झालं. अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला एकमेव कसोटी सामना ग्रेटर नोएडा येथे होणार होता. पण, अखेर तो रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला, कारण...

ग्रेटर नोएडा येथे बीसीसीआयने अफगाणिस्तानला होम ग्राऊंड म्हणून खेळण्याची परवानगी दिली होती. पहिल्या दिवसापासूनच ही कसोटी चर्चेचा विषय ठरली होती. पहिल्या दिवसाच्या आदल्या दिवशी पडलेल्या पावसामुळे खेळपट्टी ओली होती. ती सुकवण्यासाठी ग्राऊंड्सस्टाफने प्रचंड मेहनत घेतली. पण, त्यांच्यात अनुभवाची कमी जाणवली. कोणी टेबल फॅन घेऊन मैदान सुकवत होतं, तर मैदानावरील खड्डे बुझवण्यासाठी सराव खेळपट्टीवरील गवत कापून आणलं गेलं.. तरीही मैदान खेळण्यालायक न झाल्याने पहिला दिवस रद्द झाला...

दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या दिवशीही हेच चित्र दिसलं. त्यात अधूनमधून पडणारा पाऊस टेंशन वाढवत होताच. अखेर पाचव्या दिवशी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. ढिसाळ नियोजनावरून बीसीसीआयवर जोरदार टीका झाली. काहींनी BCCI चा यात दोष नसल्याची सारवासारवही केली. पण, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या BCCI कडून यापेक्षा चांगल्या सुविधेची अपेक्षा होती. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून कानपूर स्टेडियमची मागणी केली गेली होती, परंतु त्यांना हे मैदान दिले गेले, असा दावाही अफगाणिस्तानकडून केला गेला. त्यामुळे वाद आणखी चिघळला.

Afghanistan Vs New Zealand
Afghanistan Vs New Zealand esakal

ग्रेटर नोएडा येथे अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटीसाठी शुक्रवार हा शेवटचा दिवस आहे, परंतु तोही वाया गेला. एकही चेंडू न पडता हा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. खराब सुविधा आणि खराब हवामान यामुळे ही कसोटी एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द झाली. भारतीय भूमीवर कसोटी सामना एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द होण्याची ही पहिलीच वेळ असेल. १९३३ मध्ये भारताने पहिल्यांदा कसोटी सामन्याचे आयोजन केले होते आणि त्यानंतर असे केव्हाच घडले नव्हते.

Afghanistan Vs New Zealand
Afghanistan Vs New Zealand esakal

९१ वर्षात पहिल्यांदाच भारतीय भूमीवर कसोटी सामना चेंडू टाकल्याशिवाय रद्द केला गेला. आशियामध्ये याआधी केवळ एक सामना चेंडू टाकल्याशिवाय रद्द करण्यात आला आहे. १९९८ मध्ये फैसलाबाद येथे पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात हे घडले होते. एकंदरीत, जगभरात एकही चेंडू टाकल्याशिवाय केवळ सात कसोटी रद्द करण्यात आल्या आहेत. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.