IND W vs SA W: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकांसाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूचे होऊ शकते पदार्पण

India Women vs South Africa Women: दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध होणाऱ्या आगामी वनडे, टी20 आणि कसोटी मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
India Women Team
India Women TeamX/BCCIWomen

India Women Squad: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका महिला संघ जून 2024 मध्ये भारतीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्ही महिला संघात वनडे, टी20 आणि कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

या दौऱ्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधारपद स्मृती मानधनाकडे आहे. तसेच तिन्ही क्रिकेट मालिकांसाठी जेमिमाह रोड्रिग्स आणि पुजा वस्त्राकर यांचा समावेश करण्यात आला आहे, मात्र त्यांचा सहभाग तंदुरुस्तीवर अवलंबून असेल.

जेमिमाहला पाठीची दुखापत आहे. त्यामुळे तिला बांगलादेशविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेलाही मुकावे लागले होते. सध्या ती बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. तसेच पुजा वस्त्राकरला कोणती दुखापत आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

India Women Team
Virat Kohli: विराट टी20 वर्ल्ड कपसाठी अखेर अमेरिकेला रवाना, टीम इंडियाच्या सराव सामन्यात खेळणार?

दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या टी२० मालिकेदरम्यान दुखातपतग्रस्त झालेल्या यास्तिका भाटीयाच्या जागेवर यष्टीरक्षक फलंदाज उमा छेत्रीला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे तिला आता आंतरराष्ट्रीय पदार्णाची संधी असणार आहे. त्याचबरोबर प्रिया पुनिया आणि अरुंधती रेड्डी यांचे संघाच पुनरागमन झाले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा हा भारत दौरा 13 जून पासून सुरुवात होणार असून 9 जुलै रोजी संपणार आहे. 13 जूनला दक्षिण आफ्रिका सराव सामना खेळेल, त्यानंतर 16 ते 23 जून दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका होईल, तर 28 जून ते 1 जुलै दरम्यान एकमेव कसोटी सामना होईल, तर 6 ते 9 जुलै दरम्यान टी20 मालिका खेळवली जाईल.

India Women Team
T20 World Cup 2024 : संदीप लामिछानेला व्हिसा नाकारला; नेपाळमध्ये युएसविरूद्ध सुरू झालं तीव्र आंदोलन

असे आहेत भारतीय संघ -

  • वनडे मालिकेसाठी संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स *, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), दयालन हेमलथा, राधा यादव, आशा शोभना, श्रेयंका पाटील, सायका इशाक, पूजा वस्त्रकार*, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, प्रिया पुनिया

  • कसोटी सामन्यासाठी संघ - - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, शुभा सतीश, जेमिमाह रॉड्रिग्स *, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, सायका इशाक, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर *, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, प्रिया पुनिया

  • टी२० मालिकेसाठी संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दयालन हेमलता, उमा छेत्री (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स *, सजना सजीवन, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, राधा यादव, अमनजोत कौर, आशा शोभना, पूजा वस्त्राकर*, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी

राखीव खेळाडू - सायका इशाक

दक्षिण आफ्रिका महिला संघाचा भारत दौरा -

वनडे मालिका -

  • 16 जून - पहिला वनडे सामना, बेंगळुरू (वेळ - दु. 1.30 वाजता)

  • 19 जून - दुसरा वनडे सामना, बेंगळुरू (वेळ - दु. 1.30 वाजता)

  • 23 जून - तिसरा वनडे सामना, बेंगळुरू (वेळ - दु. 1.30 वाजता)

कसोटी सामना -

  • 28 जून ते 1 जुलै - एकमेव कसोटी सामना, चेन्नई (वेळ - स. 9.30 वाजता)

टी20 मालिका

  • 5 जुलै - पहिला टी20 सामना, चेन्नई (वेळ - संध्या. 7.00 वाजता)

  • 7 जुलै - दुसरा टी20 सामना, चेन्नई (वेळ - संध्या. 7.00 वाजता)

  • 9 जुलै - तिसरा टी20 सामना, चेन्नई (वेळ - संध्या. 7.00 वाजता)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com