IND vs NZ Womens ODI: भारतीय संघ महिला ट्वेंटी-२० संघ वर्ल्ड कपमधून परतल्यानंतर २४ ऑक्टोबर पासून न्युझीलंडविरूद्ध घरच्या मैदानावर वन-डे मालिका खेळणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका असून २४-२९ ऑक्टोबर दरम्यान मालिकेतील तिन्ही सामने नरेंद्र मोदी स्टेडीयम अहमदाबाद येथे खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने आज भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाच्या सततच्या अपयशामुळे व महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील भारताच्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघाच्या कर्णधार पदावरून हरमनप्रीत कौरची हाकलट्टी होणार, अशा बातम्या समोर येत होत्या. पण, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआयने हरमनप्रीतला संघाच्या कर्णधारपदी कायम ठेवले आहे.
भारतीय फलंदाज ऋचा घोषने तिच्या १२वी इयत्तेच्या बोर्ड परीक्षेमुळे मालिकेतून माघार घेतली आहे. अष्टपैलू खेळाडू आशा शोभना ट्वेंटी-२० संघ वर्ल्ड कपदरम्यान झालेल्या दुखापतीवर उपचार घेत आहे. त्यामुळे ती मालिका खेळू शकणार नाही. तर गोलंदाज पूजा वस्त्राकरला मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, डी हेमलता, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), सायली सतगरे, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, तेजल हसबनीस , सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा, राधा यादव, श्रेयंका पाटील.
१) २४ ऑक्टोबर २०२४ (गुरुवार) - दुपारी १.३० वाजता , नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
२) २७ ऑक्टोबर २०२४ (रविवार) - दुपारी १.३० वाजता , नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
३) २९ ऑक्टोबर २०२४ (मंगळवार) - दुपारी १.३० वाजता , नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद