Team India Coach: टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी CSK च्या 'गुरु'ची चर्चा! पाच वेळचा IPL विजेता कोच घेणार द्रविडची जागा?

Stephen Fleming: बीसीसीआयने भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. अशात या पदासाठी चेन्नई सुपर किंग्समधील प्रमुख सदस्याच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे.
Stephen Fleming | MS Dhoni
Stephen Fleming | MS DhoniX/ChennaiIPL
Updated on

Team India Coach: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी रात्री मोठी घोषणा केली. बीसीसीआयने भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. हे अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मे आहे.

सध्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद राहुल द्रविड सांभाळत आहे. परंतु त्याचा कार्यकाळ जून 2024 नंतर संपणार आहे. म्हणजेच जून 2024 मध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपनंतर द्रविडचा भारतीय संघाबरोबरच प्रशिक्षक म्हणून असलेला करार संपेल. अशात आता भारताला नवा प्रशिक्षक मिळू शकतो. द्रविडही पुन्हा अर्ज करू शकतो.

दरम्यान, यापूर्वीच जय शाह यांनी स्पष्ट केले आहे की भारतीय संघासाठी भारतीय किंवा परदेशी प्रशिक्षकही मिळू शकतो.

यातच आता एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. चेन्नई सुपर किंग्सचे यशस्वी प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआय अधिक पसंती देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Stephen Fleming | MS Dhoni
IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार एका सुत्राने माहिती दिली आहे की अनौपचारिक चर्चा आधीच झाली असून फ्लेमिंग यांच्याकडे द्रविडची जागा घेण्यासाठी योग्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. येत्याकाही काळात भारतीय संघ संक्रमाणातून जाणार आहे. अशात फ्लेमिंग यांचे मॅन-मॅनेजमेंट पाहाता, त्यांना ही जबाबदारी मिळू शकते.

दरम्यान, अद्याप तरी फ्लेमिंग यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. जर नसेल केला, तर ते येत्या काळात अर्ज करणार का हे पाहावे लागणार आहे.

तसेच जर हा अर्ज त्यांनी केला आणि त्यांना भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले, तर मात्र त्यांना चेन्नईचे मुख्य प्रशिक्षकपद सोडावे लागेल.

Stephen Fleming | MS Dhoni
IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

फ्लेमिंग यांचा दांडगा अनुभव

फ्लेमिंग हे 2009 पासून चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी आणि 2 चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकली आहे. तसेच त्यांनी चार वर्षे बिग बॅश लीगमधील मेलबर्न स्टार्सचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे.

त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्सचे सिस्टर फ्रँचायझी जोहान्सबर्ग सुपर किंग्स आणि टेक्सास सुपर किंग्स या संघांच्याही प्रशिक्षकपदाची जबाबदारी फ्लेमिंग यांच्याकडे आहे. ते द हंड्रेडमधील साऊदर्न ब्रेव या संघाचेही प्रशिक्षक आहेत.

त्यामुळे एकूणच फ्लेमिंग यांचा प्रशिक्षक म्हणून मोठा अनुभव आहे. त्याचबरोबर त्यांना एक खेळाडू म्हणूनही दांडगा अनुभव आहे. फ्लेमिंग हे न्यूझीलंडचे दिग्गज फलंदाज आणि कर्णधार म्हणून ओळखले जातात. त्यांनी न्यूझीलंडसाठी 396 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 17 शतके आणि 95 अर्धशतकांसह 15319 धावा केल्या आहेत.

ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे न्यूझीलंडचे तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज आहेत. इतकेच नाही, तर त्यांनी 303 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडचे नेतृत्वही केले आहे. ते एमएस धोनी आणि रिकी पाँटिंग यांच्यानंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांत नेतृत्व करणारे कर्णधार आहेत.

Stephen Fleming | MS Dhoni
Table Tennis: मनिका बत्राने रचला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी बनली पहिलीच भारतीय महिला टेबल-टेनिसपटू

साडे तीन वर्षांचा असणार करार

दरम्यान, फ्लेमिंग यांच्याव्यतिरिक्त भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी ऑस्ट्रेलियाचे जस्टिन लँगर आणि टॉम मूडी यांच्याही नावाची चर्चा आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्टी अशी की भारतीय संघासाठी बीसीसीआयची क्रिकेट सल्लागार समिती जो प्रशिक्षक निवडणार आहे, तो तिन्ही क्रिकेट प्रकारांसाठी असणार आहे. तसेच जय शाह यांनी

यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे हा प्रशिक्षक दीर्घकाळासाठी नियुक्त करण्यात येणार आहे. त्याच्याबरोबर पहिला करार साडेतीन वर्षांचा असणार आहे. म्हणजेच डिसेंबर 2027 पर्यंत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.