सचिन, युवी, भज्जी, रैनासह निवृत्त खेळाडूंना BCCI पुन्हा खेळायला लावणार; लवकरच मोठा निर्णय अपेक्षित

League for retired Player : इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर BCCI लवकरच लीग घेऊन येणार आहे आणि त्यात जगभरातील दिग्गज निवृत्त खेळाडू खेळताना दिसतील.
Sachin Raina Yuvraj BCCI
Sachin Raina Yuvraj BCCIesakal
Updated on

Sachin Tendulkar, Yuvraj Singh : सचिन तेंडुलकर पुन्हा पॅड बांधून, ग्लोव्ह्ज-हेल्मेट घालून बॅट हातात घेऊन पुन्हा एकदा मैदानावर त्याचे खणखणीत फटके मारताना दिसू शकतो. त्याच्यासोबत युवराज सिंगचे सिक्स, सुरेश रैनाची दमदार फटकेबाजी, हरभजन सिंगची फिकरी पुन्हा अनुभवायला मिळाली, तर सोने पे सुहागा! म्हणता येईल. होय हे शक्य आहे... भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) लवकरच निवृत्त झालेल्या क्रिकेटपटूंची लीग घेऊन येण्याच्या तयारीत आहे.

जगभरात ट्वेंटी-२० लीग सुरू आहेत आणि आता लिजेंड्स लीगही सुरू झाल्या आहेत. BCCI देखील आयपीएलच्या धर्तीवर दिग्गज खेळाडूंची लीग घेऊन येणार आहे. सध्या जगभरात वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स, ग्लोबल लीजेंड्स लीग, लिजेंड्स लीग क्रिकेट अशा निवृत्त खेळाडूंच्या लीग खेळवल्या जात आहेत. सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, सुरेश रैना, हरभजन सिंग, अंबाती रायडू यांच्यासह अनेक भारतीय खेळाडू या लीगमध्ये खेळतात.

Sachin Raina Yuvraj BCCI
अरेरे! पाकिस्तानला 'वडा पाव'च्या किमतीत विकावं लागतंय PAK vs BAN क्रिकेट सामन्याचं तिकीट, कारण...

मुथय्या मुरलीधरन, सनथ जयसूर्या, ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड, एबी डिव्हिलियर्स असे अनेक माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूही या लीगमध्ये खेळतात. दैनिक जागरणला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,''अलीकडेच भारताच्या काही माजी खेळाडूंनी BCCI चे सचिव जय शाह यांची भेट घेतली आणि त्यांना लीजेंड्स लीग आयोजित करण्याची विनंती केली. आयपीएलप्रमाणे लिजेंड्स लीगचे आयोजन करावे, अशी माजी क्रिकेटपटूची इच्छा आहे.''

IPL प्रमाणे लिलाव...

लिजेंड्स लीगमध्येही शहरांनुसार फ्रँचायझी संघ असावेत आणि जगभरातील खेळाडूंसाठी लिलाव लावला जाईल. BCCI ने या प्रस्तावावर शक्यता तपासण्याचे आश्वासन दिले आहे आणि जर सर्व काही ठीक झाले तर भारतातील प्रेक्षकांनाही माजी महान खेळाडूंमधील लिजेंड्स लीगचा आनंद लुटता येईल.

Sachin Raina Yuvraj BCCI
दोनाचे 'एक' होणार! इंग्लंड, स्कॉटलंड क्रिकेट संघांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू, पण का?

अन्य लीगला फटका...

BCCI शी संबंधित एका सूत्राने सांगितले की, अशी लीग भारतात सुरू झाल्यास त्याचा थेट परिणाम इतर लीगवर होईल. सध्या होणाऱ्या सर्व लीगचे आयोजन काही खासगी कंपन्या विविध क्रिकेट बोर्डांच्या सहकार्याने करत आहेत. कोणतेही क्रिकेट बोर्ड थेट लिजेंड्स लीगसारखी स्पर्धा आयोजित करत नाही. या वर्षी जूनमध्ये बर्मिंगहॅम येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सचे आयोजन इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) च्या सहकार्याने करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com