IPL Income: ११,७९६ कोटींची कमाई! आयपीएल २०२३ मध्ये BCCI च्या प्रॉफिटमध्ये ११६% वाढ; GST किती भरला ते वाचा

BCCI income from IPL 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आयपीएल २०२३ मधून ७८ टक्के अधिक नफा झाल्याचे वृत्त समोर येत आहे. आयपीएल २०२२च्या तुलनेत हा नफा ११६% वाढला आहे.
IPL2023 income
IPL2023 incomeesakal
Updated on

BCCI Indian Premier League 2023 : इंडियन प्रीमिअर लीग ही बीसीसीआयसाठी किती महत्त्वाची आहे, हे वेगळं सांगायला नको. बीसीसीआयचं आणि भारतीय क्रिकेटचं सर्व अर्थकारण हे IPL भवती फिरतेय. २००८ पासून सुरू झालेल्या या लीगने जगभरातील क्रिकेटपटूंना आकर्षित केले आणि जगातील सर्वात श्रीमंत ट्वेंटी-२० लीग बनली आहे. आयपीएल लिलावात खेळाडूंवर कोटींची बोली लागलेली पाहायला मिळते. यावरूनच या लीगमधून फ्रँचायझी आणि बीसीसीआयला किती उत्पन्न मिळतेय याचा अंदाज लावता येईल.

बीसीसीआयने आयपीएल २०२३ मधून जवळपास ५,१२० कोटी अतिरिक्त कमाई केल्याचे वृत्त समोर आले आहे. आयपीएल २०२२च्या तुलनेत ११६ टक्क्यांनी उत्पन्नात वाढ झाल्याचे समोर येत आहे. आयपीएल २०२३ मधून बीसीसीआयची एकूण कमाई ७८% जास्त झाली असून हा आकडा ११,७६९ कोटींपर्यंत गेला आहे. BCCI च्या २०२२-२३ च्या वार्षिक अहवालानुसार एकूण खर्च ६६% वाढून ६,६४८ कोटी झाला असल्याचे समोर आले आहे.

IPL2023 income
Mumbai Indians ला मोठा धक्का बसणार? अत्यंत खास खेळाडू लखनौ सुपर जायंट्सच्या वाटेवर

मीडिया हक्काने केलं मालामाल

नवीन मीडिया हक्क आणि प्रायोजकत्व सौद्यांमुळे ही वाढ झाली. २०२३-२७ या कालावधीसाठी बीसीसीआयसोबत ४८,३९० कोटींचा मीडिया हक्क करार झाला आणि आयपीएल २०२३ सीझनसह याची सुरुवात झाली. २०२१ मध्ये डिस्ने स्टारने २०२३-२०२७ या कालावधीसाठी आयपीएलचे टिव्ही राईट्स जिंकले. त्यांनी यासाठी २३,५७५ कोटींची यशस्वी बोली लावली. तेच दुसरीकडे Viacom18 च्या JioCinema ने डिजिटल हक्कांसाठी २३,७५८ कोटी रुपये मोजले.

बीसीसीआयने आयपीएल टायटल हक्क टाटा सन्सला २,५०० कोटींना पाच वर्षांसाठी विकले आहेत. याशिवाय MyCircle11, RuPay, AngelOne व Ceat यासह इतर स्पॉन्सरकडून १,४८५ कोटींची कमाई बीसीसीआयला होते. वार्षिक अहवालानुसार BCCI चे मीडिया हक्कांचे उत्पन्न आयपीएल २०२२ च्या तुलनेत ( ३,७८० कोटी) आयपीएल २०२३ मध्ये १३१% वाढून ते ८,७४४ कोटी झाले आहे.

IPL2023 income
Yuvraj Singh चा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; T20I मध्ये एका षटकात चोपल्या गेल्या ३९ धावा

फ्रँचायझी फीमधून होणारी कमाई १७३० कोटींवरून २,११७ कोटी झाली आहे. प्रायोजकत्वातून येणारा महसूल ८७४ कोटी झाला. मागील पर्वात तो ८२८ कोटी होता आणि आयपीएल २०२३ मध्ये त्यात २ टक्के वाढ झाली. आयपीएल २०१८ ते २०२२ या कालावधीत Disney Star कडे आयपीएलचे मीडिया हक्क होते आणि त्यांनी पाच वर्षांसाठी बीसीसीआयला १६,३४७ कोटी रुपये दिले होते.

बँक बॅलेन्स अन् GST

BCCI कडे आर्थिक वर्ष २०२३ च्या अखेरीस विविध बचत व चालू खाती आणि FD च्या स्वरूपात एकूण १६,४९३.२ कोटी बँक बॅलन्स होते, जे एका वर्षापूर्वी १०,९९१.२९ कोटी होते. २०२३ च्या सीझनमध्ये सेंट्रल पूलमधून आयपीएल फ्रँचायझींना ४,६७० कोटी दिले. BCCI ने आर्थिक वर्ष २०२३ -२४ मध्ये २०३८ कोटींचा GST भरला असल्याची माहिती वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.