Team India Head Coach : टीम इंडिया नवीन कोचच्या शोधात; पगारापासून ते वयापर्यंत, BCCIने ठेवल्या 'या' कडक अटी

Team India Head Coach News : भारतीय क्रिकेट संघ लवकरच 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला रवाना होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवीन कोचची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
Team India Head Coach News
Team India Head Coach Newssakal
Updated on

Team India Head Coach : भारतीय क्रिकेट संघ लवकरच 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला रवाना होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवीन कोचची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

सध्या राहुल द्रविड टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आहेत, परंतु त्यांचा कार्यकाळ जूनपर्यंत आहे. अशा स्थितीत टीम इंडिया आतापासूनच मुख्य कोचच्या शोधात आहे, जेणेकरून वेळेत योग्य व्यक्तीची या पदासाठी निवड करता येईल. अलीकडेच, एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर बीसीसीआयने राहुल द्रविडचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कपपर्यंत वाढवला होता.

Team India Head Coach News
IPL 2024 Playoffs : प्लेऑफच्या शर्यतीतून 3 संघ बाहेर, 1 क्वालिफाय, 'या' 6 संघाचे मालक टेन्शनमध्ये

कार्यकाळ आणि पगार किती असेल?

बीसीसीआयने आपल्या जाहिरातीत कोचसाठी अटी स्पष्ट केल्या आहेत. यानुसार, नवीन प्रशिक्षकाला साडेतीन वर्षांचा कार्यकाळ मिळेल, जो 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2027 पर्यंत चालेल. म्हणजेच 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर कार्यकाळ संपेल. जोपर्यंत पगाराचा प्रश्न आहे, बोर्डाने याबाबत उमेदवारांशी बोलणी करणार असून अनुभवाच्या आधारे वेतन निश्चित केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

Team India Head Coach News
Virat Kohli : विराट कोहली पुन्हा होणार कर्णधार..? 'या' दिग्गज खेळाडूनं केलं मोठं वक्तव्य

बीसीसीआयने ठेवल्या अटी

  • उमेदवाराने किमान 30 कसोटी सामने किंवा 50 एकदिवसीय सामने खेळलेले असावेत.

  • किंवा किमान 2 वर्षे पूर्ण सदस्य टेस्ट खेळणाऱ्या देशाचा मुख्य प्रशिक्षक असावा.

  • किंवा कोणत्याही असोसिएट सदस्य संघाचा/कोणत्याही आयपीएल संघाचा किंवा अशा कोणत्याही लीग किंवा प्रथम श्रेणी संघाचा किंवा कोणत्याही देशाच्या अ संघाचा 3 वर्षे प्रशिक्षक आहे.

  • किंवा बीसीसीआयचे लेव्हल-3 कोचिंग प्रमाणपत्र धारक.

  • आणि वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे.

Team India Head Coach News
KL Rahul : हे तर पेल्यातलं वादळ... केएल अन् गोयंका वादावर लखनौच्या कोचला नेमकं काय म्हणायचंय?

निवड कशी होईल?

बोर्डाचे सचिव जय शहा यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, बोर्ड मुख्य प्रशिक्षकासाठी नव्याने नियुक्ती सुरू करेल. सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना पुन्हा ही भूमिका हवी असेल तर तो अर्जही करू शकतो, असेही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. प्रशिक्षकाच्या निवडीसाठी, बीसीसीआयची क्रिकेट सल्लागार समिती म्हणजेच CAC सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेते आणि नंतर त्यांची शिफारस बोर्डाकडे पाठवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.