Big News : टीम इंडियाच्या वेळापत्रकात मोठा बदल; BCCI च्या अपडेट्सने क्रिकेटप्रेमींचा उडाला गोंधळ

The BCCI announces revised schedule for: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी टीम इंडियाच्या 2024-25 च्या आगामी होम सीझनसाठीच्या वेळापत्रकात बदल केल्याची घोषणा केली.
BCCI IND vs BAN
BCCI IND vs BANesakal
Updated on

BCCI announces revised schedule Team India : श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघ १९ सप्टेंबरपासून घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणार आहे. भारत-बांगलादेश यांच्यातल्या कसोटी मालिकेतून टीम इंडियाचा घरच्या मैदानावरील २०२४-२५ या वर्षाचा हंगाम सुरू होणार आहे. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) आज त्यात बदल करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

भारत आणि बांगलादेश यांच्यातली पहिली ट्वेंटी-२० मॅच ६ ऑक्टोबरला धर्मशाला येथे नियोजित केली होती, परंतु हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने स्टेडियमच्या नुतनीकरणास सुरुवात केल्यामुळे हा सामना ग्वालियर येथे खेळवण्यात येणार आहे.

ग्वालियरच्या नवीन श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. २०१० नंतर प्रथमच येथे आंतरराष्ट्रीय मॅच होणार आहे. २०१० मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना सचिन तेंडुलकरच्या द्विशतकाने ऐतिहासिक झाला होता. आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सचिन पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला होता.

BCCI ने याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या व दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांच्या ठिकाणांची अदलाबदल केली आहे. चेन्नईत होणारी पहिली ट्वेंटी-२० ( २२ जानेवारी २०२५) आता कोलकाता येथे होईल, तर चेन्नईत दुसरी ट्वेंटी-२० ( २५ जानेवारी २०२५) लढत होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.