Anshuman Gaekwad : अंशुमन गायकवाड यांच्या मदतीला BCCI धावली! जय शाहने इतके कोटी रुपये देण्याचे दिले आदेश

भारताला 1983 चा वर्ल्ड कप जिंकून देणारा अनुभवी अष्टपैलू आणि कर्णधार कपिल देव यांनी बीसीसीआयकडे माजी भारतीय क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांना आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती.
BCCI to offer Rs 1 crore for Anshuman Gaekwad's cancer treatment
BCCI to offer Rs 1 crore for Anshuman Gaekwad's cancer treatmentsakal
Updated on

Anshuman Gaekwad's Cancer Treatment : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा प्रशिक्षक अंशुमन गायकवाड हे ब्लड कॅन्सरशी झुंज देत आहे. त्यामुळे भारताला 1983 चा वर्ल्ड कप जिंकून देणारा अनुभवी अष्टपैलू आणि कर्णधार कपिल देव यांनी बीसीसीआयकडे माजी भारतीय क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांना आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती.

कपिल देव यांनी अंशुमन गायकवाड यांच्या मदतीसाठी त्यांची पेन्शन दान करण्याचा निर्णय घेतला होता. मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, मदन लाल आणि कीर्ती आझाद यांनीही आपल्या सहकारी खेळाडूंना मदतीचा हात पुढे केला.

गायकवाड हे लंडनमध्ये होते, पण आता ते बडोद्यात परतले आहेत, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अंशुमन गायकवाड याच्या मदतीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मदतीचा हात पुढे केला आहे.

BCCI to offer Rs 1 crore for Anshuman Gaekwad's cancer treatment
Delhi Capitals Head Coach : रिकी पाँटिंगच्या जागी कोण असणार दिल्ली कॅपिटल्सचा पुढील कोच? सौरव गांगुलीने सांगितले नाव

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी कॅन्सरशी झुंज देत असलेला भारताचा दिग्गज क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी तातडीने 1 कोटी रुपये देण्याची सूचना दिल्या आहेत. जय शाह यांनी गायकवाड यांच्या कुटुंबाशीही बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आणि मदत केली. बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेने ही माहिती दिली.

बीसीसीआयने आश्वासन दिले आहे की ते गायकवाड यांच्या उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवतील. या कठीण प्रसंगी क्रिकेट बोर्डाने माजी खेळाडू आणि त्याच्या कुटुंबीयांना पाठिंबा दर्शवला आहे.

BCCI to offer Rs 1 crore for Anshuman Gaekwad's cancer treatment
Virat Kohli Krishna Das kirtan: लंडनमध्ये कीर्तन अन् चर्चा भारतात... रॉकस्टार योगीच्या रंगात रंगले अनुष्का आणि विराट!

अंशुमन गायकवाड यांची कारकीर्द

अंशुमन गायकवाडने 1974 ते 1985 दरम्यान 40 कसोटींच्या 70 डावांमध्ये 30.07 च्या सरासरीने 1985 धावा केल्या. यामध्ये 2 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. 15 एकदिवसीय सामन्यांच्या 14 डावात 20.69 च्या सरासरीने 269 धावा केल्या. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com