BCCI
BCCI esakal

BCCI ने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील नियमांमध्ये केले बदल; खेळाडूंवर कडक कारवाई होणार जर...

Ranaji Trophy 2024: रणजी ट्रॉफी स्पर्धेला आजपासून सुरूवात झाली असून मुंबई संघ बडोद्याविरूद्ध तर, महाराष्ट्र संघ जम्मू कश्मिरविरूद्ध आपला पहिला सामना खेळत आहे.
Published on

BCCI Rules For Domestic Cricket: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आजपासून सुरू झालेल्या रणजी ट्रॉफीसह देशांतर्गत सामन्यांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हे नियम खेळाच्या विविध परिस्थीतीमध्ये लागूू होतात, ज्यामध्ये मध्येच डाव सोडणे, चेंडूशी छेडछाड, चौकार स्कोअरिंग आणि कर्नल सीके नायडू ट्रॉफी (U-23)मध्ये गुण वाटप यांचा समावेश होतो.

सर्वात महत्वाचे म्हणजे डावाच्या मध्यात फलंदाजांना आता रिटायर्ड हर्ड होऊन परतता येणार नाही. दुखापत, आजार किंवा अपरिहार्य परिस्थितींव्यतिरिक्त इतर कारणांमुळे निवृत्त झालेला कोणताही फलंदाजाला ताबडतोब बाद केले केला जाईल. महत्त्वाचे म्हणजे, विरोधी कर्णधाराच्या संमतीनेही त्यांना फलंदाजीला परतण्याची परवानगी दिली जाणार नाही. हा नियम सर्व कसोटी आणि मर्यादित षटकांच्या सामन्यांना लागू होतो.

BCCI
Viral Video: सूर्याची कॉपी करणं सोपं नाही! पाकिस्तानी फिल्डरची बाऊंड्री लाईनजवळ कॅच घेताना उडाली तारांबळ

बीसीसीआयच्या आदेशात स्पष्टपणे असे म्हटले आहे, “दुखापत, आजार किंवा अपरिहार्य कारणाशिवाय इतर कोणत्याही कारणास्तव रिटायर्ड हर्ड होऊन परतणारा फलंदाज लगेचच बाद समजला जाईल आणि संमती घेऊनही फलंदाजीला परतण्याचा पर्याय नसेल. विरोधी कर्णधाराचा.

चेंडूला थुंकी लावणाऱ्या खेळाडूवर कडक कारवाई

बॉल टॅम्परिंगला आळा घालण्यासाठी बीसीसीआयने कडक नियम लागू केला आहे. चेंडूवर थुंकी लावल्यास चेंडू बदलणे अनिवार्य केले आहे. याव्यतिरिक्त, नियम उल्लंघनासाठी जबाबदार असलेल्या संघाला दंड आकारला जाईल.

ओव्हर थ्रो धावा

जर ओव्हर थ्रो केलेला चेंडू चौकार गेला तर चार अतिरीक्त धावा मिळतील परंतु खेळाडूंनी धावून काढलेल्या धावा मोजल्या जाणार नाहीत.

BCCI
PAK vs ENG : इंग्लंडने इतिहास रचला, पाकिस्तानचा पार कचरा केला! Multan Test मध्ये विक्रमांचा पाऊस पडला

कर्नल सीके नायडू ट्रॉफीमध्ये गुणांचे वाटप

परिस्थिती १: जर 'अ' संघ त्यांच्या पहिल्या डावात ९८ षटकात ३९८ धावांवर बाद झाला तर त्यांना चार फलंदाजी गुण मिळतील. नंतर क्षेत्ररक्षण करताना त्यांना पाच पेनल्टी धावा मिळाल्यास, त्यांची धावसंख्या ९८ षटकात ४०३ होईल, ज्यामुळे त्यांना पाचवा फलंदाजीचा गुण मिळेल.

परिस्थिती २: जर 'अ' संघ १००.१ षटकात ३९८ धावांवर बाद झाला आणि पाच पेनल्टी धावा मिळाल्या, तर त्यांची धावसंख्या १००.१ षटकात ४०३ होईल. पण, १०० पेक्षा जास्त षटके खेळल्यामुळे त्यांना पाचवा फलंदाजीचा गुण मिळणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.