Team India Coach: झिम्बाब्वे दौऱ्यात कोण असणार भारतीय संघाचा कोच? BCCI सचिव जय शाह यांची घोषणा

Jay Shah on Team India New Coach: राहुल द्रविडचा भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला असल्याने नव्या प्रशिक्षकाची घोषणा कधी होणार याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी माहिती दिली आहे.
Team India | Jay Shah
Team India | Jay ShahSakal
Updated on

India Tour of Zimbabwe: भारतीय क्रिकेट संघ जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ५ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेला ६ जुलैपासून सुरुवात होत आहे.

दरम्यान, टी२० वर्ल्ड कप २०२४ संपण्याबरोबरच राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाबरोबरचा कार्यकाळही संपला आहे. त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यावर कोण प्रशिक्षक असणार असे प्रश्न उपस्थित होत असतानाच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी माहिती दिली आहे.

Team India | Jay Shah
Team India: शुभमन गिल टीम इंडियाचा कॅप्टन! 'या' मालिकेसाठी झाली 15 जणांच्या संघाची घोषणा

सध्या टी२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघासह बार्बाडोसमध्ये असलेल्या जय शाह यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघासह प्रशिक्षक म्हणून जाईल.

याशिवाय जय शाह यांनी अशीही माहिती दिली की भारतीय संघासाठी नव्या प्रशिक्षकाची लवकरच घोषणा केली जाईल. द्रविडनंतर भारतीय संघासाठी नव्या प्रशिक्षक नियुक्तीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे.

जय शाह म्हणाले, 'प्रशिक्षक आणि निवडकर्ता यांची लवकरच नियुक्ती केली जाईल. क्रिकेट सल्लागार समितीने मुलाखती घेतल्या असून दोन नावं अंतिम केली आहेत. मुंबईमध्ये पोहचल्यानंतर त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे, त्यानुसार आम्ही पुढे जाऊ. व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वेला जात आहे, पण नवा प्रशिक्षक श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासून भारतीय संघाशी जोडला जाईल.'

Team India | Jay Shah
T20 World Cup 2024: रोहितच्या रोबो वॉकचा असा शिजला होता प्लॅन, ICC च्या Video ने उघडलं रहस्य

दरम्यान, मिडिया रिपोर्ट्सनुसार गौतम गंभीर आणि डब्ल्युव्ही रमण यांना भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. आता नव्या प्रशक्षकाची घोषणा कधी होणार हे पाहावे लागणार आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ - शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार , तुषार देशपांडे

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक (टी२० मालिका) (वेळ - भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्या. ४.३० वाजता)

  • ६ जुलै - पहिला टी२० सामना, हरारे

  • ७ जुलै - दुसरा टी२० सामना, हरारे

  • १० जुलै - तिसरा टी२० सामना, हरारे

  • १३ जुलै - चौथा टी२० सामना, हरारे

  • १४ जुलै - पाचवा टी२० सामना, हरारे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com