Jay Shah: टी२० वर्ल्ड कपनंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची वार्षिक बैठक जुलै महिन्याच्या अखेरीस होणार आहे. १९ ते २२ जुलै दरम्यान ही बैठक होणार आहे. दरम्यान, या बैठकीत पुढील अध्यपदाची चर्चा होणार नसली, तरी येत्या नोव्हेंबर महिन्यात नव्या अध्यक्षासाठी निवडणूक होणार आहे.
या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीची कालमर्यादा औपचारिक ठरणे अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील आयसीसी अध्यक्षपदासाठी जय शाह यांना प्रमुख दावेदार मानले जात आहे. तथापि, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना याबद्दल निर्णय घेण्यास अद्यापही तीन महिने बाकी आहेत. त्यांनी अद्याप याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर दिलेले नाही.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या चार वर्षांपासून न्यूझीलंडचे ग्रेग बार्कल आयसीसीच्या अध्यक्षपदी आहे. त्यांना बीसीसीआयनेही समर्थन दिलेले होते. बार्कल हे अद्यापही आणखी एका कार्यकाळासाठी पात्र आहेत. त्यामुळे कदाचीत ते पुन्हा अध्यक्षपदी कायम राहण्यासाठी उत्सुक असू शकतात. मात्र, जर शाह यांनी निवडणूक लढवली, तर ते बिनविरोध निवडून येऊ शकतात.
दरम्यान, यापूर्वीच क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार आयसीसीने अध्यक्षांच्या कार्यकाळाबाबत सुधारणा केली आहे.
सध्या दोन-दोन वर्षांच्या तीन कार्यकाळात हे पद सांभाळता येत होते. पण आता नव्या बदलांनुसार तीन-तीन वर्षांचे दोन कार्यकाळ असणार आहेत. म्हणजे, जर शाह निवडून आले, तर ते ३ वर्षांसाठी या पदावर असतील.तसेच यानंतर बीसीसीआयच्या घटनेनुसार २०२८ मध्ये जय शाह बीसीसीआयचे अध्यक्ष होण्यासाठीही
ICC ने अध्यक्षांच्या कार्यकाळात सुधारणा केली आहे, ती सध्याच्या दोन वर्षांच्या तीन टर्मवरून प्रत्येकी तीन वर्षांच्या दोन टर्ममध्ये बदलली आहे. निवडून आल्यास, शाह ICC चेअरमन म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, त्यानंतर ते BCCI घटनेनुसार, 2028 मध्ये BCCI चे अध्यक्ष होण्यासाठी पात्र असतील.
दरम्यान, सध्या अशीही चर्चा आहे की आयसीसीचे मुख्यालय दुबईतून मुंबईत हालवण्याचा विचार सुरू आहे. तथापि, हा त्यांचा अजेंडा नसला, तरी असं समजत आहे की जय शाह आयसीसीच्या आत बदल करण्यास उत्सुक आहेत. विशेषत: वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे झालेल्या टी२० वर्ल्ड कपमधील संयोजनात झालेल्या गोंधळानंतर.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की वार्षित बैठकीत सहसदस्य संघांच्या संचलकांची निवडणूक १९ जुलै रोजी होणार आहे. तीन जागांसाठी ११ उमेदवार आहेत. या तिन्ही जागांचा कार्यकाळ २ वर्षांचा असणार आहे. सध्या ओमानचे पंकज खिमजी, सिंगापूरचे इम्रान ख्वाजा आणि बर्म्युडाचे नील स्पीट हे संचालकपदी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.