India vs Sri Lanka 1st T20I : भारतीय क्रिकेट संघ आजपासून म्हणजेच 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेमुळे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यकाळाचीही सुरुवात होणार आहे. यापूर्वी माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना विशेष सल्ला दिला आहे, ज्याचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शेअर केला आहे.
गौतम गंभीर श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून आपल्या प्रशिक्षक कारकिर्दीची सुरुवात करणार आहे. याआधी राहुल द्रविडने एक खास मेसेज दिला आहे. टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक झाल्याबद्दल त्याने गंभीरचे अभिनंदन केले.
राहुल द्रविड आपल्या मेसेजमध्ये म्हणाला की, "हॅलो गौतम, जगातील सर्वात रोमांचक कार्यात तुमचे स्वागत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून माझा कार्यकाळ संपून तीन आठवडे झाले आहेत." यानंतर द्रविडने बार्बाडोसच्या फायनलचा आणि मुंबईच्या विजयाच्या परेडचा उल्लेख करत या आठवणी अविस्मरणीय असल्याचे सांगितले.
पुढे माजी मुख्य प्रशिक्षकाने संघातील खेळाडूंबद्दल बोलले आणि गौतम गंभीरला शुभेच्छा दिल्या. येथे व्हिडिओ पहा....
याशिवाय, गंभीर प्रत्येक संघात फिट असलेल्या खेळाडूंना संधी देईल, अशी आशा द्रविडने व्यक्त केली. द्रविडने एका खास व्हॉईस मेसेजद्वारे गंभीरला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, गंभीरने द्रविडचे आभार मानले.
राहुल द्रविडचा कार्यकाळ 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर संपला. जेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडियाने त्याला निरोप दिला. त्यांच्यानंतर बीसीसीआयने ही जबाबदारी गौतम गंभीरकडे सोपवली आहे. त्यांना भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर होता. त्याच्या दिग्दर्शनाखाली केकेआरने आयपीएल 2024 चे विजेतेपद पटकावले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.