Rohit Sharma Virat Kohli
Rohit Sharma Virat Kohlisakal

BCCIने सर्व कसोटी क्रिकेटपटूना 'ही' स्पर्धा खेळण्याची केली सक्ती; विराट-रोहितला मात्र दिली सुट्टी

आयपीएल 2024 आधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष केल्यामुळे इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर कठोर कारवाई केली होती.
Published on

Test Specialists To Play Domestic Cricket : आयपीएल 2024 आधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष केल्यामुळे इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर कठोर कारवाई केली होती. या दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आले होते. बोर्ड याप्रकरणी मवाळ होण्याच्या मुडमध्ये दिसत नाही. मात्र, आता यातून काही खेळाडूंना सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

Rohit Sharma Virat Kohli
Chetan Sakariya Wedding : गुपचुप गुपचुप...! टीम इंडियाचा खेळाडू अडकला लग्नबंधनात; फोटो व्हायरल

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे की, जर स्टार क्रिकेटपटू राष्ट्रीय संघातून खेळत नसतील तर त्यांना देशांतर्गत सामन्यांसाठीही उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, रोहित शर्मा, विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या खेळाडूंना सूट देण्यात आली आहे. त्यांना खेळायचे आहे की नाही हे ते स्वत: ठरवतील.

Rohit Sharma Virat Kohli
Cricket Viral Video: दोन ओव्हर अन् तब्बल 61 धावा...! क्रिकेटच्या सामन्यात घडला अविश्वसनीय पराक्रम

रोहित, विराट आणि बुमराह व्यतिरिक्त बीसीसीआय इतर सर्व कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंनी ऑगस्टमध्ये बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांपूर्वी किमान एक किंवा दोन दुलीप ट्रॉफी सामने खेळावेत अशी इच्छा आहे.

दुलीप ट्रॉफीसाठी प्रादेशिक निवड समितीऐवजी राष्ट्रीय निवड समितीकडून निवड केली जाईल. बांगलादेश आणि न्यूझीलंडसोबतची कसोटी मालिका घरच्या भूमीवर होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टिकोनातून दोन्ही मालिका महत्त्वाच्या असतील. याशिवाय वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे.

Rohit Sharma Virat Kohli
Virat Kohli : 'ज्या चिकूला मी ओळखत होतो तो...' कोहलीवर दिग्गज भारतीय क्रिकेटरची टीका, रोहितबद्दल मात्र...

पीटीआयने बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, “यावेळी दुलीप ट्रॉफीसाठी प्रादेशिक निवड समिती नाही. फक्त राष्ट्रीय निवड समिती दुलीप ट्रॉफीसाठी संघांची निवड करेल. रोहित, विराट आणि बुमराह स्वतःच ठरवतील की त्यांना खेळायचे आहे की नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com