Ben Stokes Video: सेम टू सेम! स्टोक्सने आपल्याच सारख्या दिसणाऱ्या स्टेडियममधील चाहत्याला पाहून काय केलं पाहा

Ben Stokes funny Video: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामना पाहण्यासाठी आलेल्या एक प्रेक्षक हुबेहूब बेन स्टोक्ससारखा दिसत होते. त्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
Ben Stokes
Ben Stokes Sakal
Updated on

Ben Stokes funny reaction after spotting look-alike: असं म्हणतात की जगात एकसारखी दिसणारी ७ माणसं असतात. त्यामुळे कधीतरी आपल्याला आपल्याच सारखी दिसणारी व्यक्ती भेटू शकते. असाच प्रकार इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सबरोबर घडला आहे.

नुकताच ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात २४१ धावांनी विजय मिळवला. याच सामन्यादरम्यान एक मजेशीर घटना घडली.

झाले असे की सामना सुरू असताना बेन स्टोक्स ड्रेसिंग रुमच्या गॅलरीमध्ये बसलेला होता. यावेळी हा सामना स्टेडियममध्ये पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकावर कॅमेरा गेला. तो प्रेक्षक जवळपास बेन स्टोक्ससारखाच दिसत होता.

फक्त त्या प्रेक्षकाने चष्मा घातलेला होता. दरम्यान, त्या प्रेक्षकाला पाहून बेन स्टोक्स आधी हसला, त्यानंतर त्याने हाताच्या बोटांनी चष्म्यासारखा आकार करत त्यावर गमतीशीर रिऍक्शन दिली. त्यावेळी स्टोक्सच्या शेजारी जेम्स अँडरसनही बसलेला होता. त्यालाही त्याचे हसू आवरता आले नाही.

Ben Stokes
IND vs ENG: 'तो विजय ज्यानं एका पिढीला प्रेरणा दिली...' युवीने शेअर केला लॉर्ड्सवरील २२ वर्षांपूर्वीचा दादागिरीचा फ्लॅशबॅक

इंग्लंडचा विजय

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर इंग्लंडने पहिल्या डावात ८८.३ षटकात सर्वबाद ४१६ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून ऑली पोपने १२१ धावांची शतकी खेळी केली. तसेच बेन डकेटने ७१ आणि बेन स्टोक्सने ६९ धावांची अर्धशतकी खेळी केली.

वेस्ट इंडीजकडून गोलंदाजी करताना अल्झारी जोसेफने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजने पहिल्या डावात १११.५ षटकात सर्वबाद ४५७ धावा केल्या आणि ४१ धावांची आघाडी घेतली. वेस्ट इंडिजकडून कावेम हॉजने १२० धावांची खेळी केली. तसेच जोशुआ डी सिल्वाने नाबाद ८२ आणि ऍलिक एथनाथने ८२ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून या डावात गोलंदाजी करताना ख्रिस वोक्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

Ben Stokes
ENG vs WI: बापरे! विंडीजच्या फलंदाजानं मारलेल्या सिक्सनं छतचं तोडलं, तुकडे पडले प्रेक्षकांच्या अंगावर, पाहा Video

मात्र, दुसऱ्या डावात इंग्लंडने ९२.२ षटकात सर्वबाद ४२५ धावा केल्या. त्यांच्याकडून जो रुटने १२२ धावांची आणि हॅरी ब्रुकने १०९ धावांची शतकी खेळी केली. या डावात वेस्ट इंडीजकडून जेडन सिल्सने ४ विकेट्स घेतल्या.

दरम्यान, इंग्लंडने वेस्ट इंडीजसमोर ३८५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ ३६.१ षटकात १४३ धावांवरच सर्वबाद झाला. वेस्ट इंडीजकडून कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने सर्वाधिक ४७ धावा केल्या. इंग्लंडकडून शोएब बाशिरने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.