Gautam Gambhir Indian premier League KKR : भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या गौतम गंभीरला कोलकाता नाइट रायडर्सची साथ सोडावी लागली होती. त्याच्या मार्गदर्शनाखाली KKR ने बऱ्याच वर्षांनी आयपीएलचे जेतेपद नावावर केले होते. त्यामुळे त्याने KKR सोबत कायम राहवं अशी चाहत्यांची इच्छा होती. पण, टीम इंडियाकडून मिळालेली ऑफर त्याने स्वीकारली. त्यामुळ IPL 2025 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा मेंटॉर कोण असेल याची साऱ्यांना उत्सुकता होती. या पदासाठी टीम इंडियाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचे नावही चर्चेत होते. पण, आज त्यांनी मोठी घोषणा केली.
कोलकाता नाइट रायडर्सने या पदासाठी चेन्नई सुपर किंग्सचा माजी गोलंदाज ड्वेन ब्राव्हो याची निवड केली आहे. ब्राव्होने कालच कॅरेबियन प्रीमिअर लीगमधून सर्व फॉरमॅटच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ब्राव्होने मागच्या वर्षी आयपीएलमधून निवृत्ती घेतली होती. ४१ वर्षीय ब्राव्हो आता कोलकाताचा मेंटॉर म्हणून काम करताना दिसणार आहे. २००८ पासून आयपीएल खेळणाऱ्या ब्राव्होने १६१ सामन्यांत १५६० धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १८३ विकेट्स आहेत.
ड्वेन ब्राव्हो हा जगातील सर्वात Entertainer खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आयपीएलमध्ये कॅरिबियन स्वॅग आणला आणि टिपिकल वेस्ट इंडियन फ्लेवरसह तो फलंदाजी करतो. पहिल्या तीन हंगामात तो मुंबई इंडियन्ससाठी खेळला होता आणि २०११ च्या आयपीएलपूर्वी ब्राव्होला चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात घेतले. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील परफेक्ट प्लेअर असणाऱ्या ब्राव्होन आयपीएलचे अनेक सामने गाजवले. IPL 2016 च्या आधी वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू खेळाडूला गुजरात लायन्सने प्लेयर ड्राफ्टमध्ये निवडले होते. २०१८ च्या आयपीएल खेळाडूंच्या लिलावात त्याला CSK ने पुन्हा एकदा त्यांचे राईट टू मॅच कार्ड वापरून आपल्याकडे आणले.
KKR चे सीईओ वेंकी म्हैसूर म्हणाले, "ड्वेन ब्राव्होचे KKR मध्ये सामील होणे ही एक अतिशय रोमांचक गोष्ट आहे. आम्हाला आनंद आहे की तो CPL, MLC, ILT20 आणि आता IPL मध्ये जगभरातील आमच्या सर्व फ्रँचायझींमध्ये सहभागी होईल".
ड्वेन ब्राव्होने वेस्ट इंडिजसाठी ४० कसोटी, १६४ वन डे आणि ९१ ट्वेंटी-२० सामने खेळले. कसोटीत त्याने २२०० धावा आणि ८६ विकेट्स घेतल्या आहेत. वनडे फॉरमॅटमध्ये २९६८ धावांसह १९९ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. आंतरराष्ट्री ट्वेंटी-२०त त्याने १२५५ धावा केल्या आहेत आणि ७८ विकेट्सही घेतल्या. CPL मध्ये त्याने १०६ सामन्यांमध्ये ११५५ धावा केल्या आहेत आणि १२९ विकेट्सही घेतल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.