AUS vs IND : युवराज सिंग म्हणतो ऑस्ट्रेलियात जाऊन भारत...! त्याचं प्रेडिक्शन वाढवतंय चाहत्यांची धडधड

Border Gavaskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
Yuvraj singh
Yuvraj singhesakal
Updated on

Border Gavaskar Trophy Predictions: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला क्रिकेटचा सामना हा सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असतोच. त्यात बऱ्याच वर्षांनी दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार, म्हटलं की चाहत्यांसाठी पर्वणीच. अशात आतापासूनच आगामी बॉर्डर-गावस्कर मालिकेची चर्चा सुरू झाली आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांनी तयारी सुरू केली आहे. ऑस्ट्रेलियन आजी-माजी खेळाडू त्यांच्या संघाच्या पाठिशी उभे राहिले आहेत, तर भारतीय खेळाडू आम्ही जिंकू असे दावे करताना दिसत आहेत. त्यात भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) यानेही मालिकेबाबत भाकित व्यक्त केले आहे.

२२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिकेला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि स्टीव्ह स्मिथने ऋषभ पंतची स्तुती केली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी रोहित, विराट नाही तर ऋषभ पंतच्या फलंदाजीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे ऋषभ पंतसाठी नवी रणनीती आखण्याबाबत त्यांनी सांगितले.

Yuvraj singh
Shakib Al Hasan ला बांगलादेशात जायची वाटतेय भीती; म्हणतो, हवीय सुरक्षेची हमी

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबाबत दिग्गज खेळांडूदरम्यान चर्चासत्र सुरू असताना मालिकेबाबत त्यांनी संभाव्य शक्यता मांडल्या आहेत. ज्यामध्ये माजी भारतीय खेळाडू युवराज सिंगने भारत या मालिकेत ३-२ने बाजी मारेल असा अंदाज वर्तवला. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ॲडम गिलख्रिस्टने ३-१ ने ऑस्ट्रेलिया जिंकेल असे वक्तव्य केले. तर इंग्लंडचा दिग्गज मायकल वॉनने ३-२ अशा फरकाने ऑस्ट्रेलियाच्या बाजूने कौल दिला.

तुम्ही कर्णधार म्हणून कोहली, रोहित, धोनी यांपैकी कोणाला निवडाल? असा युवराजला चर्चेदरम्यान प्रश्न विचारला असता युवराज म्हणाला, " मी ट्वेंटी-२० कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड करेन. कारण तो एक उत्कृष्ट कर्णधार आहे आणि फलंदाजीतून सामना फिरवण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. म्हणून मी कर्णधार म्हणून प्रथम रोहितची निवड करेन. "

"सध्या कसोटी क्रिकेटमध्ये जो रूट पहिल्या क्रमांकाचा फलंदाज जरी असला तरी संपूर्ण कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच सर्वोतकृष्ट फलंदाज आहे," युवराज पुढे म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.