Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यात शमीला वगळण्यात आले आहे.
Mohammad Shami
Mohammad ShamiESakal
Updated on

बीसीसीआयच्या निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर केला आहे. रोहित शर्माला पाचही कसोटी सामन्यांसाठी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांना संधी देण्यात आली आहे. तसेच अभिमन्यू ईश्वरन तिसरा सलामीवीर म्हणून मैदानात उतरणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका पूर्ण झाल्यानंतर भारत ऑस्ट्रेलियामध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा एक भाग आहे, असे बीसीसीआयने सांगितले आहे. तसेच 18 सदस्यीय संघात मोहम्मद शमी स्थान मिळाले नाहीच. त्याऐवजी बुमराह, सिराज, प्रसीद कृष्णा, आकाशदीप आणि हर्षित राणा हे वेगवान गोलंदाजांना संघात स्थान मिळाले आहे. नितीश कुमार रेड्डी हा एकमेव वेगवान अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान दिले आहे.

Mohammad Shami
IND vs NZ: 'Virat Kohli जर देशांतर्गत सामना खेळला असता तर...'; दुसऱ्या कसोटीतील अपयशानंतर अनिल कुंबळे स्पष्टच बोलला

बॉर्डर-गावस्कर स्पर्धेसाठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक) , आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

राखीव: मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद

तर दुसरीकडे निवड समितीने भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही संघांची घोषणा केली आहे. भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. 8 नोव्हेंबर रोजी डर्बन येथे पहिला टी-20 खेळण्यात येणार आहे. डाव्या मांडीच्या दुखापतीमुळे कुलदीप यादवचा हा दौरा मुकला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई , अर्शदीप सिंग, विजयकुमार विशक, आवेश खान, यश दयाल.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी संघ

- भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तिसरा सलामीवीर म्हणून अभिमन्यू ईश्वरनला संधी

- १८ सदस्यीय संघात मोहम्मद शमी नाहीच

- बुमराह, सिराज, प्रसीद कृष्णा, आकाशदीप आणि हर्षित राणा हे वेगवान गोलंदाज संघात

- नितीश कुमार रेड्डी हा एकमेव वेगवान अष्टपैलू खेळाडू. शार्दुल ठाकूरला स्थान नाही

- डाव्या मांडीच्या दुखापतीमुळे कुलदीप यादव दौरा मुकला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.