Shubman Gill : शुभमन गिल चेंडू सोडायला गेला अन् उडाला त्रिफळा; Rishabh Pant ची भन्नाट कॅच Video

Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या डावात शुभमन गिल अपयशी ठरला. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी शुभमनचा हा फॉर्म टीम इंडियाची चिंता वाढवणारा आहे.
Shubman Gill Duleep Trophy
Shubman Gill Duleep Trophyesakal
Updated on

Shubman Gill Duleep Trophy 2024: भारताचा 'प्रिन्स' शुभमन गिल दुलीप ट्रॉफीच्या सलग दुसऱ्या डावात अपयशी ठरला. भारत अ संघाचे नेतृत्व करणारा गिल भारत ब विरुद्ध अपयशी ठरला. भारत ब संघाच्या ३२१ धावांच्या प्रत्युत्तरात गिल ४३ चेंडूंत २५ धावांवर बाद झाला. नवदीन सैनीच्या अप्रतिम चेंडूवर गिलचा त्रिफळा उडाला. त्यानंतर सैनीने भारत अ संघाला दुसरा मोठा धक्का देताना मयांक अग्रवालला माघारी पाठवले. यष्टिरक्षक ऋषभ पंतने अविश्वसनीय झेल घेतला.

भारत ब संघाची अवस्था ७ बाद ९४ अशी झाली होती आणि या परिस्थितीत मुशीर मैदानावर उभा राहिला. त्याने नवदीपसोबत २०४ धावा जोडल्या. मुशीरने ३७३ चेंडूंत १६ चौकार व ५ षटकारांसह १८१ धावा चोपल्या. चौकार-षटकारांनीच त्याने २१ चेंडूंत ९४ धावा जोडल्या. नवदीन १४४ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ५६ धावांवर बाद झाला आणि भारत ब संघाचा पहिला डाव ३२१ धावांवर आटोपला.

Shubman Gill Duleep Trophy
Musheer Khan : २१ चेंडूंत कुटल्या ९४ धावा! Duleep Trophy मध्ये मुशीर खानने मोडला तेंडुलकरचा मोठा विक्रम

मयांक अग्रवाल व शुभमन गिल भारत अ संघाला चांगली सुरुवात करून देतील असे वाटले होते. पण, नवदीपने गोलंदाजीतही कमाल करून दाखवली. १४व्या षटकाच्या शेवटचा चेंडू सोडणं गिलला महागात पडले. नवदीपने टाकलेला चेंडू आत शिरला अन् गिलचा त्रिफळा उडाला. गिलने २५ धावा केल्या. त्यानंतर १६व्या षटकात नवदीपच्या चेंडूवर ऋषभने सुरेख झेल घेतला. मयांक ४५ चेंडूंत ३६ धावांवर बाद झाला. भारत अ संघाच्या २८ षटकांत २ बाद १११ धावा झाल्या आहेत. रियान पराग व लोकेश राहुल मैदानावर आहेत.

दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीनंतर बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे दुलीप ट्रॉफीतील कामगिरीवर निवड समितीचे लक्ष आहे. सध्यातही मुशीर खानने भारत ब संघाकडून दमदार खेळ करून आपलं नाणे खणखणीत वाजवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.