Ishan Kishan सुपर फॉर्मात! पहिल्या डावात शतक अन् नंतर दोन खणखणीत षटकारांनी विजय, Video

Ishan Kishan hitting winning sixes : बुची बाबू क्रिकेट स्पर्धेत इशान किशन तुफान फॉर्मात दिसतोय आणि पहिल्या डावातील शतकामुळे त्याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराने गौरविले
ishan kishan
ishan kishanesakal
Updated on

Ishan Kishan Buchi Babu Trophy : आंतरराष्ट्रीय संघातून दुरावलेला इशान किशन देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून मायदेशात परतलेल्या इशानला BCCI ने देशांर्तग क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. पण, त्याने त्याकडे काणाडोळा केला आणि BCCI ने डावखुऱ्या फलंदाजाची वार्षिक करारातून हकालपट्टी केली. फटका बसल्यानंतर इशान आता बुची बाबू क्रिकेट स्पर्धेत खेळतोय. झारखंड संघाचे नेतृत्व करताना इशानने दमदार फलंदाजी करून मध्य प्रदेशला पराभूत केले.

झारखंड विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यातल्या सामन्यात इशानचाच दबदबा पाहायला मिळाला. संघाला विजयासाठी १२ धावांची गरज असताना इशानने ३ चेंडूंत दोन षटकार खेचून सामना संपवला. या सामन्यात त्याने पहिल्या डावात शतक झळकावले होते. दुसऱ्या डावात त्याने ५८ चेंडूंत नाबाद ४१ धावांची खेळी केली.

ishan kishan
WTC Point Table: वेस्ट इंडिजच्या पराभवाचं पाकिस्तानला दुःख! भारताला टक्कर देण्याचं स्वप्न राहू शकतं अपूर्ण

मध्य प्रदेशने दिलेल्या १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झारखंडची अवस्था ६ बाद १३५ धावा अशी झाली होती. संघ अडचणीत असताना इशान मैदानावर उभा राहिला आणि त्याने धावफलक हलते ठेवले. झारखंडने १६३ धावांपर्यंत मजल मारली तोपर्यंत आणखी २ फलंदाज बाद झाले होते. त्ययानंतर इशानने गिअर बदलला आणि दोन षटकार खेचून सामना संपवला.

बुची बाबू स्पर्धेत दमदार कामगिरीसोबतच इशानने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दावा सांगितला आहे. बीसीसीआय निवड समिती लवकरच आगामी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.