Ravichandran Ashwin : अश्विन परत येणार, राजकोट कसोटीत पुन्हा गोलंदाजी करणार? दिनेश कार्तिक म्हणाला...

Ravichandran Ashwin IND vs ENG 3rd Test : अश्विन राजकोट कसोटीत गोलंदाजी करताना दिसेल?
Ravichandran Ashwin
Ravichandran Ashwin esakal
Updated on

Ravichandran Ashwin Dinesh Karthik India Vs England : भारतीय संघ राजकोटमध्ये तिसरा कसोटी सामना खेळत आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर कसोटीतील 500 विकेट्स पूर्ण करणारा रविचंद्रन अश्विन अचानक वैद्यकीय कारणामुळे आपल्या घरी परतला. तिसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडचा पहिला डाव 319 धावात संपुष्टात आणला. मोहम्मद सिराजने 4 तर कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Ravichandran Ashwin
Ind vs Eng 3rd Test Day 3 : सिराजनंतर यशस्वीनं गाजवला तिसरा दिवस, भारताकडे भक्कम आघाडी

तिसऱ्या दिवशी जरी अश्विनच्या गोलंदाजीची फारशी उणीव भासली नसली तरी सामन्याच्या चौथ्या डावात भारताला अश्विनची उणीव भासू शकते. बीसीसीआयने रविचंद्रन अश्विन हा संपूर्ण सामन्याला मुकणार असल्याचं सांगितलं मात्र तो सामना सुरू असताना कधीही परतू शकतो.

तो परत येऊन थेट गोलंदाजी करू शकतो. अश्विनसोबत तामिळनाडूकडून क्रिकेट खेळणाऱ्या दिनेश कार्तिकने समालोचन करताना सांगितले की, या कसोटी सामन्यात अश्विन कधीही परतू शकतो आणि थेट गोलंदाजी करू शकतो. पंचांनी अश्विनला ती मुभा दिली आहे.

नियम काय सांगतो?

क्रिकेटच्या नियमानुसार कोणताही खेळाडू जर 8 मिनिटापेक्षा जास्त काळ मैदानाबाहेर राहिला तर तो खेळाडू मैदानावर येऊन थेट गोलंदाजी करू शकत नाही. गोलंदाजी टाकण्यापूर्वी त्याला जेवढा काळ तो बाहेर होता तेवढा काळ मैदानावर वेळ घालवावा लागेल.

मात्र बाह्य दुखापतीमध्ये हा नियम लागू नाहीये. खेळाडू कितीही काळ बाहेर राहिला तरी तो मैदानावर 90 मिनिटे थांबून गोलंदाजी करू शकतो. मात्र अश्विनला इमर्जन्सीच्या परिस्थितीमध्ये यात सवलत दिली आहे. तो कधीही येऊन गोलंदाजी करू शकतो.

Ravichandran Ashwin
BCCI ची खेळाडूंना शेवटची वॉर्निंग! रणजी ट्रॉफी खेळली नाही तर भोगावे लागतील वाईट परिणाम

भारतीय संघाकडे फक्त 4 गोलंदाज

अश्विन घरी परतल्यामुळे भारतीय संघाकडे आता फक्त 4 स्पेशलिस्ट गोलंदाज उरले आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा हे चारच पर्याय रोहितकडे आहेत. सर्फराज खान आणि यशस्वी जैस्वाल हे पार्ट टाईम गोलंदाजी करतात. दोघांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी गोलंदाजीचा सराव देखील केला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.