Babar Azam Rasign: बाबर आझमचा मोठा निर्णय, पाकिस्तान क्रिकेटमध्ये गोंधळ

Pakistan cricket captain: पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने अचानक कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Babar azam
Babar azamesakal
Updated on

Babar Azam Rasign from captaincy: पाकिस्तान पुरूष क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याने अचानक कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री १२.१८ वाजता बाबरने सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत त्याचा हा निर्णय जाहीर केला आहे.

बाबरची यापूर्वी कसोटी कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती आणि त्याच्या जागी शान मसूदची नियुक्ती करण्यात आली होती. २०२३ वन-डे वर्ल्ड कप मधील पराभवानंतर, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ साठी बाबरच्या जागी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नंतर बाबरला पुन्हा कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले.

Babar azam
Pakistan Cricket: शाहिन आफ्रिदीला ट्वेंटी-२० कर्णधारपदावरून हटवणे हा अन्याय...; माजी खेळाडूला संताप अनावर

बाबरने सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत त्याच्या निर्णयामामागचे कारण स्पष्ट केले आहे. बाबर चाहत्यांना संबोधित म्हणाला, "आज मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करत आहे. गेल्या महिन्यात मी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PBC)आणि संघ व्यवस्थापनाला दिलेल्या सूचनेनुसार मी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. परंतु माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेत आहे. कर्णधारपदाचा अनुभव चांगला होता, पण त्यामुळे कामाचा ताण वाढला आहे. मला माझ्या कामगिरीला प्राधान्य द्यायचे आणि फलंदाजीचा आनंद घ्यायचा आहे. सोबतच माझ्या कुटुंबासोबतही वेळ घालवायचा आहे.

कर्णधारपद सोडण्याने माझी भूमिका स्पष्ट होईल. माझ्या खेळावर आणि वैयक्तिक वाढीवर अधिक लक्ष्य केंद्रित करेन. तुमचा अतूट पाठिंबा आणि माझ्यावरील विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. आपण मिळून जे काही साध्य केले आहे त्याचा मला अभिमान आहे आणि एक खेळाडू म्हणून संघासाठी योगदान देत राहण्यास उत्सुक आहे. तुमच्या प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद."

२०१९ मध्ये बाबरची पाकिस्तानच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. नंतर २०२० मध्ये वन-डे आणि कसोटी संघाची जबाबदारीही बाबरकडे सोपवण्यात आली. २०१९ ते २०२४ मध्ये एकूण १४८ सामन्यांमध्ये बाबरने पाकिस्तान संघाचे नेतृत्व केले. त्यापैकी ८४ सामने पाकिस्तान संघाने जिंकले आहेत.

मागच्या काही महिन्यात पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदावर अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. पाकिस्तानच्या कर्णधारपदी मागील काही महिन्यात अनेक फेरबदल करण्यात आले. सध्या पाकिस्तान कसोटी संघाची जबाबदारी शान मसूदकडे सोपवण्यात आली आहे. परंतु काही मीडिया अहवालानुसार पाकिस्तान कर्णधारपदी अनुभवी फलंदाज मोहम्मद रीझवानचे नाव समोर येत आहे.

Babar azam
Pakistan Cricket मध्ये पुन्हा मोठा बदल! माजी दिग्गजाने दिला सिलेक्टर पदाचा राजीनामा, कारणही सांगितलं

अशातच वन-डे आणि ट्वेंटी-२० कर्णधार बाबर आझमने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. २ दिवसांपूर्वी दिग्गज खेळाडू मोहम्मद युसूफ यांनी पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीमधील निवडकर्ता म्हणून राजीनामा दिला. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.