Ben stokes rule out of 1st Test against PAK: इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने पाकिस्ताविरूद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ७ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी बेन स्टोक्सचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला होता. परंतु दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्यामुळे स्टोक्सने ही मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत ऑली पोपच्या खांद्यावर संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
'दी हंड्रेड' लीगदरम्यान ११ ऑगस्ट रोजी मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे स्टोक्सला मैदानाबाहेर जावे लागले होते. त्यामुळे श्रीलंका कसोटी मालिकेदरम्यान इंग्लंड संघाची धुरा ३३ वर्षीय यष्टीरक्षक ऑली पोपने सांभाळली. इंग्लंडने या मालिकेत २-१ ने विजय मिळवला होता.
स्टोक्सकने प्रशिक्षणानंतर स्पष्ट केले की, "मी या पहिल्या सामन्यासाठी स्वत:ला तंदुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु हा सामना मला खेळता येणार नाही. कारण प्रशिक्षणानंतर असे लक्षात आले की मी खेळाण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त झालो नाही."
"मी या मालिकेत खेळण्यासाठी वैद्यकीय टीमसह कठोर परिश्रम केले आहेत. मी या दुखापतीतून अपेक्षेपेक्षा जास्त सावरलो आहे असे मला वाटते . मी १५ ऑक्टोबरपासून होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी स्वत:ला तंदुरूस्त करण्याचा प्रयत्न करत आहे." स्टोक्स पुढे म्हणाला.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वन-डे मालिकेतील पराभव पत्कारल्यानंतर इंग्लंड संघ तीन सामन्यांची कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. ७ ऑक्टोबर (सोमवार) रोजी स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानमधील मुल्तान येथे खेळवला जाईल. WTC तालिकेत इंग्लंड पाचव्या स्थानी आहे. पाकिस्तान संघ बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर आठव्या स्थानी घसरला आहे. पाकिस्तान-इंग्लंड दरम्यान २०२२ मध्ये झालेल्या शेवटच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने ३-०ने विजय मिळवला होता.
ऑली पोप (कर्णधार), गस ॲटकिंन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, जोश हल, जॅक लीच, मॅथ्यू पॉट्स, जो रूट , जेमी स्मिथ, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, रेहान अहमद
शान मसूद (कर्णधार), साऊद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, मीर हमजा, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नसीम शाह, नोमान अली, सईम अयुब, सलमान अली अघा, सर्फराज अहमद (यष्टीरक्षक), शाहीन शाह आफ्रिदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.