IND vs PAK Womens : महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात कर्णधार हारमनप्रीत कौर भारताला विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना तिच्या मानेला दुखापत झाली. जिंकण्यासाठी अवघ्या २ धवांची गरज असताना कौर दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतली.
यावेळी तिच्या चेहऱ्यावर होणारा त्रास आणि डोळ्यांमध्ये अश्रू दिसत होते. त्यामुळे तिच्या पुढील सामन्यातील खेळाबाबद संभ्रम निर्माण झाला आहे. हरमनप्रीत भारतीय कर्णधार आणि आघाडीची फलंदाज असून तिला पुढील सामने खेळणे भारतासाठी अत्यंत गरजेचे आहे. एकीकडे भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करणे आव्हानत्मक असताना भारतीय कर्णधारने मैदानाबाहेर जाणे धोकादायक ठरू शकते.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील न्युझीलंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानविरूद्धच्या या दुसऱ्या सामन्यात भारताने बाजी मारली. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निदा दारने पाकिस्तानसाठी सर्वाधिक २८ धावांचे योगदान दिले. मुनीबा अली ( १७), सायेदा शाह ( १४) व कर्णधार फातिमा सना ( १३ ) धावा केल्या. पण, भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव १०५ धावांवर रोखला.
स्मृती मानधनाच्या रूपाने भारताला पहिला धक्का मिळाला. शफाली वर्मा ( ३२) व जेमिमा रॉड्रीग्ज यांनी चांगली फटकेबाजी केली. जेमिमानंतर फलंदाजीसाठी आलेली रिचा घोष शून्यावर माघारी परतली आणि सामना चुरशीचा बनला.
हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्माच्या जोडीने सामना विजयाच्या उंबरठ्यावर आणला. जिंकण्यासाठी ८ चेंडूत २ धावांची गरज असताना हरमनप्रीत दारने फेकलेला फिरीकी चेंडू फेकण्यासाठी पुढे सरसावली. पण चेंडू मीस झाला आणि माघारी परतताना हरमनच्या मानेला दुखापत झाली. त्यामुळे रिटायर्ड हर्ट होऊन हरमन माघारी परतली. पुढे सजीवन संजनाने चौकार मारून भारताला विजयी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.