Rohit Sharma Statement: भारतीय क्रिकेट संघावर गुरुवारी (१७ ऑक्टोबर) नामुष्की ओढावली. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू येथे होत असलेल्या कसोटीत ४६ धावांवर सर्वबाद झाला. ही भारताचा आशिया खंडातील कसोटीमधील सर्वात निचांकी धावसंख्या आहे. भारत आणि न्यूझीलंड संघात बुधवारपासून कसोटी मालिका सुरू झाली.
मात्र, बंगळुरू कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ झाला नव्हता. त्यानंतर गुरुवारी या सामन्याला सुरुवात झाली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
मात्र भारतीय संघ ३१.२ षटकात सर्वबाद ४६ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर भारतीय संघाचे क्षेत्ररक्षणही फारसे चांगले झाले नाही. भारतीय खेळाडूंकडून काही झेलही सुटले. याबद्दल रोहितने त्याची प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की एखादा दिवस वाईट असू शकतो.