Rohit Sharma ने मुंबईच्या रस्त्यावर अचानक गाडी थांबवली अन् चाहतीला केलं 'बर्थ डे विश'; Video Viral

IND vs BAN : दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियवर आज भारतविरूद्ध बांगलादेश मालिकेतील दुसरा सामना होणार आहे.
rohit sharma and fangirl
rohit sharma and fangirlesakal
Updated on

Rohit Sharma Wished Happy Birthday to Fangirl: बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा विश्रांतीवर आहे. या मालिकेत भारताने २-० ने विजय मिळवला. या मालिकेनंतर रोहित शर्मा आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावत आहे. काही दिवसांपू्र्वी रोहित शर्मा कर्जत-जामखेड येथे क्रिकेट स्टेडियमच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित राहीला होता. त्यानंतर रोहितने दुबई येथे सुरू असलेल्या महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची भेट घेतली होती. तर आज रोहित शर्मा मुंबईमध्ये गाडी चालवत असताना अचानक गाडी थांबवून एका चाहतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईमध्ये प्रवास करत असताना एका चाहतीने रोहितची गाडी थांबली व रोहितने गाडीची काच खाली केली. तितक्यात एकाने तिचा आज वाढदिवसाच्या असल्याचे सांगितले. त्यामुळे रोहितने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेतील विजयानंतर भारतीय संघ आता तिन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. भारताने हा सामना ७ विकेट्सने जिंकला. तर दुसरा सामना आज दिल्लीमधील अरुण जेटली मैदानावर होणार आहे.

rohit sharma and fangirl
IND vs BAN: दुसऱ्या T20I साठी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये सूर्यकुमार-गंभीर बदल करणार? जाणून घ्या कोणाला मिळू शकते संधी

ग्वालियार येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा डाव १२७ धावांवर गुंडाळला. वेगवान गोलंदाज अर्शदिप सिंग व फिरकीपटू वरून चक्रवर्थीने सामन्यात प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. मयंक यादवने आपल्या पदार्पण सामन्यातील पहिल्या षटकात एकही धाव दिली नाही दुसऱ्या षटकात एक विकेट मिळवला. तर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या व वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी १ विकेट घेतला.

बांगलादेशचे १२८ धावांचे आव्हान भारताने केवळ १२ षटकांमध्येच पूर्ण केले. संजू सॅमसन व कर्णधार सुर्यकुमार यादवच्याने प्रत्येकी २९ धावा केल्या तर सलामीवीर अभिषेक शर्मा १६ धावांवर परतला. पदार्पण सामना खेळणारा नितीश रेड्डी(१६) व हार्दिक पांड्याने(३९) धावा करत सामना जिंकला. भारताने या डावामध्ये १५ चौकार व ७ षटकार ठोकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.