Ranji Trophy: ऋतुराज गायकवाड ऑन फायर! अवघ्या ८७ चेंडूत ठोकलं शतक; महाराष्ट्राचं मुंबईविरुद्ध दमदार पुनरागमन

Ruturaj Gaikwad Century for Maharashtra against Mumbai: रणजी ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाडने वादळी शतक ठोकताना महाराष्ट्राला मुंबईविरुद्ध पुनरागमन करून दिलं आहे.
Ruturaj Gaikwad | Ranji Trophy | Maharashtra vs Mumbai
Ruturaj Gaikwad | Ranji Trophy | Maharashtra vs Mumbaisakal
Updated on

Ranji Trophy 2024-25, Maharashtra vs Mumbai: रणजी ट्रॉफी २०२४ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत मुंबई विरुद्ध महाराष्ट्र संघात शरद पवार क्रिकेच अकादमी, बीकेसी येथे सामना सुरू आहे. या सामन्यात पहिल्या डावात मुंबईचे वर्चस्व दिसले, पण दुसऱ्या डावात महाराष्ट्राने दमदार पुनरागमन केले आहे.

महाराष्ट्राकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने वादळी शतक झळकावले आहे. त्याला सचिन धसने भक्कम साथ दिली असून दीडशतकी भागीदारी केली आहे.

ऋतुराजने तिसऱ्या दिवशी (२० ऑक्टोबर) मुंबईच्या शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर पुल शॉट खेळत दुहेरी धाव घेतली आणि त्याच्या शतकाला गवसणी घातली.

Ruturaj Gaikwad | Ranji Trophy | Maharashtra vs Mumbai
Ranji Trophy 2024: साई सुदर्शनचे द्विशतक, Ishan kishan चे शतक, तर वॉशिंग्टन सुंदरची तुफान फटकेबाजी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.