आता माझी सटकली! Carlos Brathwaite बॅटने हेल्मेट भिरकावले, डग आऊटमध्ये राडा, Video Viral

Carlos Brathwaite : वेस्ट इंडिजला २०१६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये अविश्वसनीय विजय मिळवून देणाऱ्या कार्लोस ब्रेथवेटने आज सर्व मर्यादा पार केल्या अन्...
Carlos Brathwaite angry T10 League
Carlos Brathwaite angry T10 League esakal
Updated on

Carlos Brathwaite angry T10 League : वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज कार्लोस ब्रेथवेट याला त्याच्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही. कॅरेबियनमध्ये सुरू असलेल्या Max60 लीगच्या सुपर थ्री सामन्यात ब्रेथवेटला अम्पायरने चुकीचे पद्धतीने बाद दिले आणि त्यानंतर त्याचा राग अनावर झाला. मैदानाबाहेर जाताने त्याने रागात बॅटने हेल्मेट बाऊंड्रीच्या बाहेर टोलवले आणि त्यानंतर डग आऊटमध्ये जाऊन बॅट फेकली. ब्रेथवेटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

न्यूयॉर्क स्ट्रायकर्ससंघाकडून ब्रेथवेट सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. ४ चेंडूंत ७ धावा करणाऱ्या ब्रेथवेटचा डावाच्या नवव्या षटकात शॉर्ट पिच चेंडू मारण्याच्या प्रयत्नात फटका हुकला. चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती विसवला आणि त्यांनी जोरदार अपील केले. अम्पायरने त्याला बाद दिले. यानंतर ब्रेथवेटचा राग अनावर झाला. त्यानंतर त्याने हेल्मेटला बॅट मारून सीमारेषेबाहेर पाठवले.

ब्रेथवेट बाद झाल्यानंतर न्यूयॉर्कने १० षटकांत आठ गडी गमावून १०४ धावा केल्या. प्रत्युत्तरात ग्रँड केमन जॅग्वारचा संघ १० षटकांत पाच गडी गमावून केवळ ९६ धावा करू शकला आणि त्यांना पराभवासह लीगमधून बाहेर पडावे लागले. ब्रेथवेटच्या संघाने विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम सामन्यात प्रथम खेळताना कॅरेबियन टायगर्स संघाने सहा गडी गमावत १२५ धावा केल्या. प्रत्युत्तरात ब्रेथवेटच्या न्यूयॉर्क स्ट्रायकर्सचा संघ ८.१ षटकांत ६९ धावांत तंबूत परतला. कॅरेबियन संघाने ५६ धावांनी विजेतेपद पटकावले.

कार्लोस ब्रेथवेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्टार...

कार्लोसने २०१६ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये अविश्वसनीय फटकेबाजी केली होती. इंग्लंडच्या ९ बाद १५५ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने ६ बाद १६१ धावा केल्या. शेवटच्या षटकात विजयासाठी १९ धावांची गरज असताना कार्लोसने बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर चार खणखणीत षटकार खेचून विंडीजला दुसरे वर्ल्ड कप विजेतेपद जिंकून दिले. या सामन्यात मार्लोस सॅम्युअलने ६६ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह नाबाद ८५ धावा केल्या. कार्लोसने १० चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ३४ धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.