PSL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

PSL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर
Updated on

PSL vs IPL : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन पाकिस्तानात होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. 1996 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात आयसीसी ट्रॉफी होत आहे. त्यामुळे पीसीबी याची जोरदार तयारी करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी ही 2025 च्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. यावेळी पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग खेळवली जाते. अशा परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

आयपीएल अन् पीएसएल क्लॅश होणार

पाकिस्तान क्रिकेट बोर्डने पाकिस्तान सुपर लीगच्या 10 व्या हंगामाती विंडो प्रस्तावित केली आहे. पीएसएल साधारणपणे फेब्रुवारी ते मार्च महिन्यात होते. मात्र 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार असल्याने पीसीबी पीएसएलचा 10 वा हंगाम हा एप्रिल आणि मे महिन्यात खेळणार आहे. यापूर्वी पीएसएलचा हंगाम हा कधीही एप्रिल - मे महिन्यात झाला नव्हता.

मे महिन्याच्या शेवटी घेतला जाणार निर्णय

पाकिस्तान सुपर लीगची सुरूवात 2016 मध्ये झाली होती. पीएसएलने सहसा आयपीएलच्या हंगमाशी क्लॅश होणे टाळलं होतं. मात्र फेब्रुवारी 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे पीएसएलचा हंगाम पुढे ढकलण्यात येणार आहेत.

चार मे रोजी पीसीबी आणि पीएसएलमधील सहभागी संघ यांच्यात बैठक होणार आहे. याबाबतचा शेवटचा निर्णय हा पीएसएल काऊन्सिलच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

आयपीएल आणि पीएसएल या दोन लीग भारतीय उपखंडातल्या सर्वात मोठ्या दोन टी20 लीग आहेत. या दोन लीगमध्ये आतापर्यंत तरी कधी क्लॅश झालेला नाही. पीएसएल खेळणारे खेळाडू आयपीएलमध्ये देखील खेळतात. अशा परिस्थितीत जर क्लॅश झाला तर खेळाडू आयपीएलला निवडतात की पीएसएलला निवडतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पीएसएलच्या तुलनेत खेळाडूंना आयपीएलमध्ये मोठी रक्कम मिळते. तसेच आयपीएल ही जगातील सर्वात महागडी क्रिकेट लीग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()