Champions Trophy 2025 Schedule : पुढच्या वर्षाची सुरूवात होणार धमाकेदार; पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं शेड्युल एका क्लिकवर

Champions Trophy 2025 : पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे संभाव्य वेळापत्रक पीसीबीने जाहीर केलं आहे. भारतीय संघ पाकिस्तानात खेळणार की नाही हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.
Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 marathi newsesakal

The Champions Trophy 2025 Schedule : पुढच्या वर्षी पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जाणार आहे. हे आयोजन फेब्रवारी ते मार्च महिन्यात होणार असून भारतीय संघाने अजून पाकिस्तानमधील ही चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही याबाबत स्पष्ट निर्णय दिलेला नाही.

कसा असेल चॅम्पियन्स ट्रॉफीचा फॉरमॅट?

ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक संघ ग्रुपमधील दुसऱ्या संघासोबत सामना खेळणार आहे. हा सिंगल रॉबिन राऊंड फॉरमॅट असेल. दोन ग्रुपमध्ये टीम्सची विभागणी केली जाईल. त्यानंतर ग्रुप स्टेजमधील पहिल्या दोन टीम थेट सेमी फायनलसाठी पात्र होतील. या दोन सेमी फायनलमधील विजेते फायनलमध्ये एकमेकांना भिडणार आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जगातील सर्वात चांगले संघ खेळत असतात त्यामुळे ग्रुप स्टेजमधील प्रत्येक सामना हा नॉक आऊट सारखाच असतो.

Champions Trophy 2025
KL Rahul: बीसीसीआयने पंतप्रधानांना जर्सी भेट देताच केएल राहुल का आला ट्रेंडिंगवर?

चॅम्पियन्स ट्रॉफीचं शेड्युल

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नुकतेच चॅम्पियन्स ट्रॉफीचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यात 20 दिवसात 15 सामने होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा 1 मार्चला लाहोर येथे होणार आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे स्टेडियम

पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कराची, लाहोर आणि रावळपिंडी हे तीन व्हेन्यू निश्चित केले आहेत. या तीन व्हेन्यूवरच स्पर्धेतील सर्व 15 सामने होण्याची शक्यता आहे. राजकीय आणि सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडिया पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही याबाबत अजून स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

Champions Trophy 2025
Team India Arrival Live Updates : टीम इंडिया मुंबईत दाखल; काहीच वेळात निघणार विजयी मिरवणूक

लाहोरमध्ये सात सामने होणार आहेत. त्यात फायनलचा देखील समावेश आहे. तर कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियमवर उद्घाटनाचा आणि एक सेमी फायनल सामना होणार आहे. तिथं एकूण तीन सामने होणार आहेत. तर रावळपिंडीत पाच सामने होणार आहेत. यात एका सेमी फायनलचा देखील समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com