C. K. Naidu Cricket Trophy : चंडीगडला विजयासाठी ७४ धावांची गरज

चंडीगड येथे सुरू झालेल्या कर्नल सी. के. नायडू करंडक (२३ वर्षांखालील) साखळी क्रिकेट स्पर्धेत निशुंक बिर्लाच्या अचूक गोलंदाजीने मंगळवारी चंडीगड संघाला निर्णायक विजयाच्या वाटेवर नेऊन ठेवले.
C. K. Naidu Cricket Trophy
C. K. Naidu Cricket Trophysakal
Updated on

पुणे : चंडीगड येथे सुरू झालेल्या कर्नल सी. के. नायडू करंडक (२३ वर्षांखालील) साखळी क्रिकेट स्पर्धेत निशुंक बिर्लाच्या अचूक गोलंदाजीने मंगळवारी चंडीगड संघाला निर्णायक विजयाच्या वाटेवर नेऊन ठेवले.

चंडीगड येथील सेक्टर नंबर १६च्या मैदानावरील या चारदिवसीय लढतीत पहिल्या डावात ५० धावांनी पिछाडीवर पडलेल्या महाराष्ट्राने कालच्या बिनबाद ८ धावांवरून सुरुवात केली. त्यांचा दुसरा डाव २१० धावांत संपुष्टात आला. रिषभ हाडके (४७) आणि विकी ओस्तवाल (४६), सिद्धेश वीरने (४३) संघाचा डाव सावरला. निशुंक बिर्लाने ७३ धावा देऊन पाच गडी बाद केले.

C. K. Naidu Cricket Trophy
Andreas Brehme : जर्मनीचे वर्ल्डकप विजेते फुटबॉलपटू ब्रेहम यांचे निधन

त्याला हर्षितने तीन तर अमित शुक्लाने दोन गडी बाद करून सुरेख साथ केली. चंडीगडला विजयासाठी १६१ धावांची गरज होती. त्यांनी दुसऱ्या डावात सावध पण आश्वासक सुरुवात करताना तिसऱ्या दिवसअखेरीस १७ षटकांत १ बाद ८७ धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा नेहल पजनी ३६, तर अर्जुन आझाद ४५ धावांवर खेळत होते. त्यांना विजयासाठी अजून ७४ धावांची आवश्यकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()