MS Dhoni: ३१ ऑक्टोबरच्या आधी सांगतो...! धोनीच्या मनात नेमकं चाललंय काय? CSK च्या गोटातून मोठे अपडेट्स

MS Dhoni availability for CSK in IPL 2025: आयपीएल २०२५ मेगा ऑक्शनपूर्वी प्रत्येक संघ कोणत्या खेळाडूंना संघात कायम करणार याबाबत चर्चा सुरू आहे. यातच सर्वांना उत्सुकता आहे ती चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी आयपीएल २०२५ स्पर्धा खेळणार की नाही.
MS Dhoni
MS Dhonisakal
Updated on

MS Dhoni CSK News: इंडियन प्रीमियर लीग २०२५ हंगामाबाबात क्रिकेट वर्तुळात बरीच चर्चा आहे. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे या हंगामाआधी होणारे मेगा ऑक्शन. या आयपीएल लिलावापूर्वी प्रत्येक संघ कोणत्या खेळाडूंना संघात कायम करणार याबाबत अनेकांनी विविध अंदाज बांधले असून अनेक रिपोर्ट्सही समोर येत आहे.

अशातच सर्वांना उत्सुकता आहे ती चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी आयपीएल २०२५ स्पर्धा खेळणार की नाही. याबाबतच आता चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी अपडेट्स दिले आहेत.

आयपीएल लिलावापूर्वी कोणत्या खेळाडूंना संघात कायम करणार आहे, हे जाहीर करण्यासाठी फ्रँचायझींना ३१ ऑक्टोबर ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. प्रत्येक फ्रँचायझीला एकूण ६ खेळाडूंना संघात लिलावापूर्वी कायम करण्याची परवानगी आहे. यात ५ कॅप खेळाडू असू शकतात.

MS Dhoni
IPL 2025: तब्बल ९ वर्षांनंतर दिल्ली कॅपिटल्सचा महत्त्वाचा शिलेदार सोडणार संघाची साथ?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.