IPL Auction पूर्वी CSK ने दिले मोठे संकेत... त्या फोटोने चाहत्यांना केलं खूश

Chennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्सने नुकताच धोनी आणि जडेजाचा एक खास फोटो शेअर करत चाहच्यांना खूश केले आहे.
CSK Shares MS Dhoni - Ravindra Jadeja
CSK Shares MS Dhoni - Ravindra JadejaSakal
Updated on

CSK Shares photo of MS Dhoni-Ravindra Jadeja: क्रिकेट वर्तुळात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ पूर्वी होणाऱ्या लिलावाची जोरदार चर्चा आहे. कोणत्या खेळाडूला कोणता संघ करारमुक्त करणार, कोणत्या खेळाडूसाठी कोणता संघ बोली लावू शकतो, अशा अनेक चर्चा सध्या होत आहेत.

विविध रिपोर्ट्सही समोर आले आहेत. अशातच चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना खूश केले आहे.

चेन्नईने कोणता फोटो केला पोस्ट?

चेन्नई सुपर किंग्सने माजी कर्णधार एमएस धोनी आणि रविंद्र जडेजा यांचा एका शेतातील फोटो शेअर केला आहे. यामध्ये जडेजा सेल्फी घेताना दिसतोय, तर धोनीही मागे उभा आहे. या फोटोला चेन्नईने कॅप्शन दिले आहे की 'कल्पना करा की थाला आणि आणि थालापती एकत्र फिल्डवर आहेत.'

CSK Shares MS Dhoni - Ravindra Jadeja
MS Dhoni की एबी डिव्हिलियर्स? कारकीर्दिची १६ वर्षे अन् १६ कठीण प्रश्न! Virat Kohli ची भन्नाट उत्तरं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.