India vs Australia Test Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. यंदा ही मालिका ऑस्ट्रेलियन भूमीत होणार असून २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये या स्पर्धेला सुरुवात होईल. या मालिकेसाठी सध्या दोन्ही संघांची तयारी जोरदार सुरू आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पोहचला असून सरावालाही सुरुवात केली आहे. मात्र, याचदरम्यान, भारताचा टेस्ट स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराचीही चर्चा होताना दिसत आहे.
पुजारा नेहमीच बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारताचा महत्त्वाचा फलंदाज ठरला आहे. मात्र, यंदा त्याला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. परंतु, असं असलं तरी पुजारा या मालिकेपासून दूर राहणार नाही, कारण त्याला या मालिकेसाठी एक नवी जबाबदारी मिळाली आहे.