Sri Lanka Cricket: श्रीलंकेला मोठा धक्का! जयवर्धनेनंतर आता 'या' दिग्गजानेही सोडली संघाची साथ, कारणही सांगितलं

Chris Silverwood Resigns: टी20 वर्ल्ड कप 2024 मधील आव्हान लवकर संपल्यानंतर श्रीलंका क्रिकेटला मोठे धक्के बसताना दिसत आहेत.
Sri Lanka Cricket team
Sri Lanka Cricket teamSakal
Updated on

Sri Lanka Cricket Head Coach Resigns: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत श्रीलंका क्रिकेट संघाची कामगिरी अगदीच खराब झाली. वनिंदू हसरंगाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या श्रीलंकेचे आव्हान पहिल्याच फेरीत संपले होते. त्यांना चार सामन्यांपैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला होता.

यानंतर आता श्रीलंका क्रिकेटला मोठे धक्के बसत आहेत. बुधवारी (26 जून) माहेला जयवर्धनेने श्रीलंकेच्या संघाच्या सल्लागार प्रशिक्षकाच्या पदाचा (Consultant Coach) राजीनामा दिला होता.

यानंतर आता ख्रिस सिल्व्हरवूड यांनी श्रीलंका संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी त्यांच्या राजीनाम्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की आता त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे.

Sri Lanka Cricket team
IND vs ENG: 'भारताला हरवायचे असेल, तर...', सेमीफायनलपूर्वी इंग्लंडला टी20 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचा इशारा

सिल्व्हरवूड म्हणाले, 'आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक असताना दीर्घकाळ तुमच्या प्रेमाच्या माणसांपासून दूर रहावे लागते. माझ्या कुटुंबाबरोबर बरीच चर्चा केल्यानंतर आणि जड अंत:करणाने मला वाटते की आता घरी परतण्याची वेळ आहे आणि कुटुंबासमवेत एकत्र वेळ घालवायचा आहे.'

तसेच सिल्व्हरवूड यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि श्रीलंका क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनेचेही आभार मानले. तसेच ते म्हणाले, 'श्रीलंका क्रिकेटचा भाग होणे माझ्यासाठी सन्मानाचे होते. मी माझ्याबरोबर चांगल्या आठवणी घेऊन जात आहे.'

Sri Lanka Cricket team
T20 World Cup 2024: कोण इतिहास रचणार? द. आफ्रिका-अफगाणिस्तान संघात पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी चुरस

इंग्लंड क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद सोडल्यानंतर सिल्व्हरवूड यांनी एप्रिल 2022 मध्ये श्रीलंका संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेने 2022 मध्ये टी20 आशिया कप जिंकला होता. आणि 2023 आशिया कपमध्येही श्रीलंका अंतिम सामन्यात पोहचला होता. त्याचबरोबर काही अविस्मरणीय विजयही श्रीलंकेने मिळवले.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेने 8 कसोटी, 26 वनडे आणि 18 टी20 सामने जिंकले.

Pratima olkha:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.