Rohit Sharma : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रोहितसह मुंबईच्या खेळाडूंचा वर्षावर झाला सत्कार

CM Eknath Shinde Rohit Sharma : टी 20 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील मुंबईच्या खेळाडूंनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.
CM Eknath Shinde Felicitated Rohit Sharma
CM Eknath Shinde Felicitated Rohit SharmaESAKAL

CM Eknath Shinde Felicitated Rohit Sharma : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भारताचा टी 20 वर्ल्डकप विजेत्या संघातील मुंबईच्या खेळाडू अन् सपोर्ट स्टाफचा आज गौरव केला. मुंख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत रोहित शर्मा आणि त्याचे सहकारी विधान भवनात देखील दाखल झाले.

कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय संघातील मुंबईचे खेळाडू अन् सपोर्ट स्टाफ यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी शाल, गणपतीची मूर्ती देण्यात आली. यावेळी रोहित शर्मासोबतच संघ सहकारी यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव देखील उपस्थित होते. तसेच एकनाथ शिंदेंनी संघाचे बॉलिंग कोच पारस म्हाब्रेंचा देखील सत्कार केला.

CM Eknath Shinde Felicitated Rohit Sharma
INDW vs RSAW : अवघ्या 150 रूपयात पाहा भारत-दक्षिण आफ्रिका टी 20 सामना; जाणून घ्या तिकीट कसं करायचं बुक

भारतीय संघाने 29 जूनला दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टी 20 वर्ल्डकप 2024 वर आपलं नाव कोरलं. त्यानंतर भारतीय संघ कधी मायदेशात परततो याची सर्वांना उस्तुकता होती. मात्र टीम इंडिया बार्बाडोसच्या वादळात अडकली. तब्बल 4 दिवसांनी भारतीय संघ मायदेशात परतला.

4 जुलैला भारतीय संघ दिल्लीत दाखल झाला. त्यानंतर भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तिथे उपहाराचा आनंद घेतल्यानंतर संघ दुपारी मुंबईसाठी रवाना झाला. मात्र पावसाळी वादळामुळे संघाला विलंब झाला. अखेर नरीमन पॉईंटवर थांबलेल्या चाहत्यांना टीम इंडियाचे दर्शन झाले अन् याच चाहत्यांच्या जनसागराच्या साक्षीने टीम इंडिया वानखेडेवर पोहचली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com